INDIA Bloc In Further Trouble As Jayant chaudhary Led RLD Mulls Going With BJP Ahead Of Lok Sabha Polls 
देश

UP Politics: कमी जागा घेणार पण भाजपसोबतच जाणार! रालोद मार्ग बदलण्याच्या तयारीत; जाणून घ्या 3 कारणे

RLD Mulls Going With BJP Ahead Of Lok Sabha: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत गेले. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. आता उत्तर प्रदेशमध्ये देखील इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

कार्तिक पुजारी

लखनऊ- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत गेले. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. आता उत्तर प्रदेशमध्ये देखील इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी भाजपमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे ते अखिलेश यादव यांच्यासोबत सात जागा घेणार होते. पण, आता ते भाजपसोबत पाच जागा देखील घेण्यास तयार असल्याचं समजतंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रालोद आणि भाजप नेत्यांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे जयंत चौधरी याबाबत लवकरत निर्णय घेण्याची शक्यता आहे. चौधरी यांनी सपासोबत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. अखिलेश यादव आणि त्यांच्यामध्ये चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. मात्र, जयंत चौधरी हे भविष्याची चिंता करत भाजपसोबत जाण्याचा विचार करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

जिंकण्याबाबत शंका

जयंत चौधरी यांना इंडिया आघाडीसोबत राहण्यापेक्षा भाजपसोबत जाण्यात अधिक लाभ दिसून येत आहे. २०२२ मध्ये सपाच्या समर्थनानेच जयंत चौधरी हे राज्यसभा खासदार बनले होते. ते भाजपसोबत गेले तर त्यांची जिंकण्याची शक्यता जास्त आहे. सपासोबत सात जागांवर लढलं तरी किती जागा जिंकता येतील याबाबत रालोदमध्ये विश्वास नाही. त्यामुळे सात जागा सोडून भाजपसोबत पाच जाग घेत ते मार्ग बदलण्यात तयार आहेत.

पक्षाची मान्यता जाण्याचा धोका

रालोदला पक्षाची मान्यता जाण्याचा धोका देखील सतावत आहे. मतदारांच्या संख्येत घट झाल्यास पक्षाची मान्यता जाऊ शकते. त्यामुळे भाजपसोबत जाणे त्यांच्यासाठी सोयीचे ठरणार आहे. भाजपसोबत गेल्यास मतदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. २००९ मध्ये रालोदने भाजपसोबत निवडणूक लढवली होती. त्यावेळी पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे रालोद पुन्हा एकदा हा फॉर्म्युला वापरु शकते.

जाट मतदार

रालोदला मत विभाजनाचा धोका सतावत आहे. रालोदला मोठ्या प्रमाणात जाट मतदारांचा पाठिंबा आहे. पण, २०१७, १०१९ आणि २०२२ मध्ये जाट मतांचे विभाजन झाले. भाजपला देखीट जाट समूदाय मतदान करत असतो. त्यामुळे आताही मोठ्या प्रमाणात जाट समूदाय भाजपसोबत जाण्याचा शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन रालोद भाजपसोबत जाऊ पाहात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT