India Population Marathi News
India Population Marathi News India Population Marathi News
देश

World Population Day : पुढील 78 वर्षांत भारताची लोकसंख्या 41 कोटींनी होईल कमी, संशोधनातून आले समोर

सकाळ डिजिटल टीम

World Population Day 2023 : भारत (India) हा जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्वांत जास्त लोकसंख्या (Population) असलेला देश आहे. परंतु, पुढील ७८ वर्षांत भारताची लोकसंख्या ४१ कोटींनी कमी होईल असा अंदाज आहे. स्टॅनफोर्डच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, सन २१०० पर्यंत भारतातील लोकसंख्येची घनताही कमी होण्याची अपेक्षा आहे. एवढेच नाही तर सन २१०० मध्ये चीनची लोकसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ७८ वर्षांत चीनची (China) लोकसंख्या केवळ ४९ दशलक्ष इतकी कमी होईल. (India Population Marathi News)

स्टॅनफोर्डच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जेव्हा लोकसंख्येची (Population) वाढ नकारात्मक असते तेव्हा त्या लोकसंख्येचे ज्ञान आणि जीवन स्थिर होते. परंतु, ते देखील हळूहळू नाहीसे होते. अर्थात हा एक हानिकारक परिणाम आहे. भारताच्या लोकसंख्येची घनता येत्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या भारत आणि चीनची लोकसंख्या सारखीच दिसते. पण त्यांच्या घनतेत खूप फरक आहे.

भारतात (India) प्रति चौरस किलोमीटर सरासरी ४७६ लोक आहेत, तर चीनमध्ये प्रति चौरस किलोमीटर फक्त १४८ लोक आहेत. सन २१०० पर्यंत भारताची लोकसंख्या घनता ३३५ प्रति व्यक्ती कमी होण्याची शक्यता आहे. भारताच्या लोकसंख्येच्या घनतेत झालेली घट ही जगाच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचा अंदाज आहे.

भारताच्या लोकसंख्येच्या घनतेच्या अंदाजात झालेली घसरण हे देशातील कमी लोकसंख्येमुळे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाच्या ताज्या अहवालात भारताची लोकसंख्या २०२२ मध्ये १४१.२ कोटीने कमी होऊन २१०० मध्ये १००.३ कोटी होण्याची शक्यता आहे. चीन (China) व अमेरिकेसारख्या इतर देशांमध्येही असाच कल दिसण्याची अपेक्षा आहे. सन २१०० मध्ये चीनची लोकसंख्या आश्चर्यकारकपणे ९३.२ कोटीने घसरून ४९.४ कोटी होऊ शकते. हे अंदाज कमी प्रजनन दरांवर आधारित आहेत.

प्रजनन दरात घट

प्रजनन दरात घट झाल्यामुळे लोकसंख्येमध्ये घट अपेक्षित आहे. भारताचा प्रजनन दर प्रति स्त्री १.७६ वरून २०३२ मध्ये १.३९, २०५२ मध्ये १.२८, २०८२ मध्ये १.२ आणि २१०० मध्ये १.१९ होण्याची अपेक्षा आहे. स्टॅनफोर्ड अभ्यासात असे म्हटले आहे की भारतासह जगासाठी तीव्र घसरणीचा कल दिसून येत आहे. जसजसे देश श्रीमंत होत जातात तसतसे प्रजनन दर हळूहळू कमी होत जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT