देश

Import From China: चीनच्या व्यापाऱ्यांकडून 'असा' चुकवला जातोय कर, भारतीय कापड उद्योगाला फटका; आयातबंदीची मागणी

सकाळ डिजिटल टीम

Import From China: चीनकडून आयात होणाऱ्या मायक्रो फायबर टॉवेल, मॅनमेड फॅब्रिक्स, टॉवेल, रेडीमेड कपडे यामुळे भारतातील लाखो कामगारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या आयातीवर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी येथील कापड कारखानदार व कामगारांनी केली आहे.

अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहतीत शनिवारी कारखानदार आणि कामगारांची बैठक झाली. यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा म्हणाले, चीनमधून येणाऱ्या कपड्यांमुळे भारतातील विशेषतः सोलापुरातील कापड उद्योगाला मोठा फटका बसत आहे. चीनहून भारतात येणारा माल तेथील निर्यात करणारे व्यापारी भारतातील व्यापाऱ्यांना कमी रकमेचे बिल करून पाठवत आहेत. तसेच उर्वरित पैसा हवालामार्फत पाठवले जात असल्याची माहिती मिळत आहे. परिणामी भारत सरकारला मिळणारा मोठा कर लपविला जात आहे.

या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषी व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच चीनमधून येणाऱ्या मायक्रो फायबर टॉवेल आणि मॅनमेड फॅब्रिक्सवर तत्काळ बंदी घालावी. या बैठकीनंतर तत्काळ कारखानदार आणि कामगारांच्या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल व राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्र्यांना पाठवण्यात आले.

या बैठकीस भाजप शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, निलेश फोफलिया, श्रीनिवास दुभास, गजानन बोकडे, सदानंद कोडम, श्रीनिवास कामुनी, नागेश गुंडला, देवसानी, कमल फोफलिया आदी उपस्थित होते.(Latest Marathi News)

दोन लाख जणांवर बेकारीचे संकट

सोलापूर शहरात टॉवेल, रेडीमेड कपडे आणि इतर कपडे उत्पादनाचा कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय आहे. चीनमधून करचुकवेगिरी करून भारतात येणाऱ्या सुमार दर्जाच्या टॉवेल, कपड्यांमुळे सोलापूर शहरातील या उत्पादनांना असलेली मागणी थंडावली आहे.

परिणामी यावर अवलंबून असलेल्या कारखानदार, कामगार आणि इतर अशा तब्बल २ लाखांहून अधिक जणांवर प्रचंड मोठे संकट ओढवणार आहे. त्यामुळे आता केंद्रीय स्तरावरून ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : आचारसंहिता होती अन्यथा...डोबिंवलीतील MIDC हलवण्याबाबत उद्योगमंत्र्यांचं मोठं विधान

Dombivli MIDC Blast: एक स्फोट... जमीन हादरली, संपूर्ण कंपनी बेचिराख; साखरपुडा सोडून लोक सैरावैरा पळू लागले

Virat Kohli : विराट कोहली पुढच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार; इंग्लंडचा माजी कर्णधार हे काय म्हणाला?

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीतील केमिकल कंपनी भीषण स्फोटाने प्रोबेस स्फोटाच्या आठवणी झाल्या ताज्या

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फायदा, बँक-आयटी शेअर्स तेजीत

SCROLL FOR NEXT