ANI
देश

Corona Update - देशात दिवसभरात 38 हजार नवे रुग्ण; 478 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन आठवड्यात चढ उतार होताना दिसत आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन आठवड्यात चढ उतार होताना दिसत आहे. दरम्यान, काही राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने इशाराही दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 38 हजार 667 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 478 जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 3 कोटी 21 लाख 56 हजार 493 इतकी झाली आहे.

सध्या देशात 3 लाख 87 हजार 673 सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 35 हजार 743 इतकी आहे. तर आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 38 हजार 88 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 4 लाख 30 हजार 732 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 2.05 टक्के इतका आहे. तसंच दररोजचा पॉझिटिव्हीटी रेट हा गेल्या 19 दिवसांपासून 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. शुक्रवारी हा पॉझिटिव्हीटी रेट 1.73 टक्के इतका होता.

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुरु आहे. आतापर्यंत 53 कोटी 61 लाख 89 हजार 903 जणांना डोस देण्यात आले असून शुक्रवारी दिवसभरात 63 लाख 80 हजार 937 जणांना लस देण्यात आली.

महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे 6 हजार 686 नवीन रुग्ण आढळले. तर 158 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 63 लाख 82 हजार 76 नवे रुग्ण आढळले आहेत. तर मृत्यूची संख्या 1 लाख 34 हजार 730 इतकी झाली. गेल्या 24 तासात राज्यात 5 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत 61 लाख 80 हजार 871 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 3 लाख 70 हजार 890 जण होम क्वारंटाइन आहेत. सध्या 63 हजार 4 जण उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : अवघी पंढरी विठ्ठलमय! 20 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

SCROLL FOR NEXT