corona update corona update
देश

देशातील रुग्णसंख्येचा उतरता आलेख; जाणून घ्या आजची आकडेवारी

कार्तिक पुजारी

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे

नवी दिल्ली- देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मे महिन्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. कोरोना रुग्णांच्या संख्येने 4 लाखांचा आकडाही पार केल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, जून महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 92 हजार 596 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या 1 लाखांच्या आत आली असून मंगळवारी 90 हजारांपेक्षा कमी रुग्ण संख्या आढळली होती. (india corona update covid19 active cases health minister)

बुधवारी कोरोनाचे 92 हजार 596 रुग्ण आढळले, तर 1 लाख 62 हजार 664 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 2219 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 3 लाख 53 हजार 528 रुग्णांचा जीव कोरोना विषाणूने घेतला आहे. देशात एकूण 2 कोटी 90 लाख 89 हजार 069 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 2 कोटी 75 लाख 04 हजार 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्या कोरोनाचे 12 लाख 31 हजार 415 सक्रिय रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कोरोना विषाणूवर मात करण्याची लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचं तज्त्राचं मत आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 23 कोटी 90 लाख 58 हजार 360 नागरिकांना कोरोनाचा पहिला किंवा दुसरा डोस मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत लशीची घोषणा केली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला गती येण्याची आशा आहे.

दिवसभरातील कोरोना रुग्ण- 2,90,89,069

दिवसभरातील डिस्चार्ज- 1,62,664

दिवसभरातील मृत्यू- 2219

एकूण कोरोनासंख्या- 2,90,89,069

एकूण डिस्चार्ज- 2,75,04,126

एकूण मृत्यू- 3,53,528

सक्रिय रुग्णसंख्या- 12,31,415

एकूण लसीकरण- 23,90,58,360

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT