corona  sakal
देश

दुसरी लाट ओसरतीय! देशात दिवसभरात 1 लाख 14 हजार रुग्ण

कार्तिक पुजारी

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दीड लाखांच्या खाली आढळत आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दीड लाखांच्या खाली आढळत आहे. याशिवाय मृतांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. देशातील अनेक राज्यातही रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. कधीकाळी सर्वाधिक रुग्णसंख्या आढळत असलेल्या महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 14 हजार 460 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 1 लाख 89 हजार 232 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्याही कमी होत आहे. शनिवारी देशात 2 हजार 677 मृतांची नोंद झाली. आतापर्यंत कोरोना महामारीने 3 लाख 46 हजार 759 रुग्णांना बळी घेतला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 14 लाख 77 हजार 799 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

भारतात एकूण 2 कोटी 88 लाख 09 हजार 339 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 2 कोटी 69 लाख 84 हजार 781 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत 23 कोटी 13 लाख 22 हजार 417 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. कोरोनावर मात करण्याची लसीकरणच हाच प्रभावी मार्ग असल्याचं तज्त्रांचं मत आहे. त्यामुळे देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी

राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात शनिवारी प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. शनिवारी कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. तीन महिन्यात प्रथमच सर्वात कमी १३ हजार ६५९ कोरोना रुग्णांचे निदान झाले. दि. १० मार्च २०२१ रोजी इतकेच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सातत्याने दैनंदिन रुग्ण संख्या वाढत होती. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील १ लाख ८८ हजार ०२७ इतकी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT