india covid 
देश

Corona Update - देशात एक कोटी रुग्ण; 325 दिवसांपूर्वी सापडला होता पहिला कोरोनाबाधित

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - देशात गेल्या तासात कोरोनाचे 25 हजार 152 नवे रुग्ण आढळले असून यासोबत भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटींच्या पुढे गेली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी 4 हजार 599 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 347 जणांचा मृत्यू झाला. 

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 ला सापडला होता. त्यानंतर आतापर्यंत 325 दिवसात देशातील रुग्णसंख्या एक कोटींवर पोहोचली आहे. भारत जगातील दुसरा असा देश आहे जिथं एक कोटीपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारताच्या आधी सर्वाधिक अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण आहेत. 

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा एक कोटीवर पोहोचला असला तरी रिकव्हरी रेट दिलासादायक आहे. आतापर्यंत 95.46 टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या 3.08 टक्के रुग्ण उपाचर घेत आहेत. भारतातील पॉझिटिव्हीटी रेट 2.14 इतका असून मृत्यूदर 1.45 टक्के आहे.

भारतात आतापर्यंत 16 कोटींहून अधिक लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 11 टक्के इतकं आहे. यापैकी 6.25 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली. देशात सर्वाधिक महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने झाला. महाराष्ट्रात पॉझिटिव्हिटी रेट 15.8 टक्के इतका आहे. याशिवाय गोव्यात 13.1 टक्के, चंदिगढमध्ये 11.4 टक्के, नागालँडमध्ये 10 टक्के तर केरळमध्ये 9.7 टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. 

महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे 3 हजार 994 नवीन रुग्ण आढळले. त्यासोबत राज्यात एकूण बाधितांची संख्या वाढून 18 लाख 88 हजार 767 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेला आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात राज्यात 75 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे 48 हजार 574 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17 लाख 78 हजार 722 इतकी आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

Sweat Energy : बॅटरी-चार्जरचं टेन्शन संपलं! शरीराच्या घामातून तयार होणार वीज; फक्त हातावर चिटकवा 'हे' स्टिकर अन् चार्जिंग फूल

‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला ! पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

Mughal History: सर्वात शक्तिशाली मुघल बादशहा होता समलैंगिक! तरण्याबांड पोराच्या प्रेमाखातर बायकोलाही सोडून दिलेलं

SCROLL FOR NEXT