Corona patients esakal
देश

Corona Update: देशात नवे रुग्ण वाढले; केरळमध्ये कोरोनाचा कहर

कार्तिक पुजारी

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढत आहे. केरळमध्ये भारताच्या एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढत आहे. केरळमध्ये भारताच्या एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे जवळपास 47 हजार रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी 509 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे एकट्या केरळमध्ये शुक्रवारी 32 हजार 801 नवे कोरोना रुग्ण आढळलेत आणि 179 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे देशात लसीकरणाचा वेग वाढला असून शुक्रवारी एका दिवसात 1 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस देण्यात आला आहे. (India Corona Update)

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 46 हजार 759 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत, तर 509 रुग्णांचा जीव गेला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांपेक्षा खूप कमी आहे. गेल्या 24 तासांत 31 हजार 374 रुग्णांनी विषाणूला हरवलं असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत देशात 3 कोटी 26 लाख 49 हजार 947 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या भारतात कोरोनाचे 3 लाख 59 हजार 775 सक्रिय रुग्ण आहेत.

भारतात कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या वाढून 4 लाख 37 हजार 370 झाली आहे. आतापर्यंत 3 कोटी 18 लाख 52 हजार 802 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत 62 कोटी 29 लाख 89 हजार 134 लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 कोटी 03 लाख 35 हजार 290 इतके विक्रमी लसीकरण झाले आहे.

दरम्यान,महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. राज्यात दररोज पाच ते सहा हजारांच्या दरम्यान रुग्ण संख्या आढळत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या स्थिरतेकडे असल्याचं म्हणता येईल. पण, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या जनतेला सतर्क केले आहे. सणांनतर राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा इशारा त्यांनी नागरिकांना दिला आहे. सणांच्या दरम्यान लोकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

जे बात! हात हातात येणार, शरूच्या प्रेमात शायनरची विकेट पडणार; 'सनई चौघडे' मध्ये नवा ट्विस्ट, प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

२० वर्षीय भारतीय तरुणानं गर्लफ्रेंडला संपवलं, अमेरिकेतून जर्मनीला पळाला; विमानतळावर उतरताच अटक

बर्थडेला शेतात राबली प्राजक्ता माळी; ‘शेतकरी प्रमाणपत्र आहेच’ म्हणत केली भात लावणी, Viral Video

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT