corona 
देश

देशात रिकव्हरी रेट 96.66 टक्के; दिवसभरात 51 हजार 667 नवे रुग्ण

कार्तिक पुजारी

गेल्या २४ तासांत देशात ५१ हजार ६६७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या ६० हजारांपेक्षा कमी आहे.

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जाताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ५१ हजार ६६७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या ६० हजारांपेक्षा कमी आहे. गुरुवारी ६४ हजार ५२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ३२९ कोरोनाबाधित रुग्णांना मृत्यू झालाय. काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. शिवाय डेल्टा आणि डेल्या प्लस व्हेरियंट्स रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. (india corona update today covid19 active cases health ministry)

भारतात एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत देशात ३ कोटी ०१ लाख ३४ हजार ४४५ रुग्णांची नोंद झाली आहे, २ कोटी ९१ लाख २८ हजार २६७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत ३ लाख ९३ हजार ३१० रुग्णांना कोरोनामुळे जीव गेला आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झालीये. सध्या देशात कोरोनाचे ६ लाख १२ हजार ८६८ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या ४३ दिवसांपासून देशात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्याची संख्या जास्त आहे.

देशाचा रिकव्हरी रेट ९६.६६ टक्के झाला आहे. पॉझिटिव्हिटी रेट गेल्या १८ दिवसांपासून ५ टक्क्यांच्या खाली नोंदला जात आहे. त्यामुळे ही दिलासादायक बातमी आहे. देशात आतापर्यंत ३० कोटी ७९ लाख ४८ हजार ७४४ लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. गुरुवारी देशात ६०.७३ लाख लोकांना लस देण्यात आली. गेल्या २४ तासांत १७ लाख ३५ हजाप ७८१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत जवळपास ४० कोटी लोकांची चाचणी करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी

राज्यात गुरुवारी 9 हजाप 844 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, तर नवीन 9 हजार 371 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57 लाख 62 हजार 661 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 21 हजार 767 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.93% झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT