corona 
देश

देशात नवे 48 हजार 786 कोरोना रुग्ण; दिवसभरात 1 हजार मृत्यू

कार्तिक पुजारी

भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जाताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ७८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६१ हजार ५८८ कोरोना रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे.

नवी दिल्ली- भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जाताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ७८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६१ हजार ५८८ कोरोना रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांच्या आसपास आढळत आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ५ लाख २३ हजार २५७ सक्रीय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (india corona update today covid19 active cases Union Ministry of Health)

गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १००५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंचा आकडा हजारांच्या पुढे गेल्याने चिंता वाढली आहे. सलग ४९ व्या दिवशी देशात कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या बाधित होणाऱ्यांपेक्षा अधिक आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचा दर म्हणजे रिकव्हरी रेट ९६.९७ टक्के झाला आहे. आठवड्याचा पॉजिटिव्हिटी रेट २.६४ टक्के आहे. देशात लसीकरणाच्या मोहिमेनेही गती घेतली आहे. देशातील जवळपास ३३.५७ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्र कोरोना आकडेवारी

राज्याच्या कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून रिकव्हरी रेट ९६.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यासाठी ही दिलासादायक बाब असली तरी पुण्या-मुंबई सारख्या बड्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आलेली रुग्णसंख्या वाढल्यानं ही चिंतेची बाब ठरू शकते. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी ९,७७१ कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली तर नवीन १०,३५३ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५८,१९,९०१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या १,१६,३६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.०२ टक्के झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT