कोरोना 
देश

Coronavirus: 24 तासांत 2.2 लाख रुग्ण, 4454 जणांचा मृत्यू

नामदेव कुंभार

coronavirus in india, covid-19, latest updates : देशात नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यामध्ये दररोज घट होत असल्याचं दिसत आहे. मात्र, मृताची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात दोन लाख 22 हजार 315 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 454 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत तीन लाख 2 हजार 544 जणांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच, रविवारी 84 हजार 683 उपचाराधीन रुग्ण कमी झाले आहे. याआधी शनिवारी 2.40 लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. तर 3741 जणांचा मृत्यू झाला होता.

23 मे 2021 पर्यंत देशभरात 19 कोटी 0 लाख 51 हजार 962 कोरोना डोस देण्यात आले आहे. रविवारी देशभरात 9 लाख 42 हजार 722 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत 33 कोटी 5 लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. रविवारी देशात 19.28 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात सध्या पॉझिटिव्ह रेट 12 टक्के आहे.

देशातील कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण - 2,67,52,447

एकूण कोरोनामुक्त - 2,37,28,011

एकूण मृत्यू - 3,03,720

उपाचाराधीन रुग्ण - 27,20,716

एकूण लसीकरण - 19,60,51,962

देशातील कोरोना मृत्यूदर 1.13 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 88 टक्केंपेक्षा जास्त आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 11 टक्केंनी घटली आहे. उपचाराधीन रुग्णांमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, ब्राझिल यांच्यानंतर भारतात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT