harsh vardhan 
देश

भारताची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे टेन्शन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देशातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. देशातील कोरोनाचा ससंर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यात नाइट कर्फ्यु तसंच अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावर बोलताना हर्षवर्धन यांनी म्हटलं की, 'कोरोनाला रोखण्यासाठी अंशत: लॉकडाऊन फारसं प्रभावी नाही.' डॉक्टर हर्षवर्धन यांच्या या वक्तव्यानं आता देशात लॉकडाऊन लागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशातील काही राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ या राज्यांचा समावेश आहे. देशभरात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहेत. शुक्रवारी जवळपास 60 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. 

एका कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन यांनी सांगितलं की, सोशल डिस्टन्सिंगचं पालन झाल्यास कोरोनाला रोखता येऊ शकतं. मात्र अंशत: लॉकडाऊन किंवा नाइट कर्फ्यू, आठवड्याच्या शेवटी करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनचा फारसा फरक पडत नाही. सरकार लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यावर विचार करत आहे. लसीकरणासाठी असलेली वयोमर्यादा कमी करण्यात येत आहे. सरकार आता कोरोनाला रोखण्यासाठी आधीच्या तुलनेत अधिक तयारीने प्रयत्न करत आहे. देशात सध्या सहा लशींवर काम सुरु आहे. या लशींची ट्रायल वेगवेगळ्या टप्प्यात आहे. त्यामुळे आशा आहे की, लवकरच देशाला आणखी लशी मिळतील. आता दोन लशींना परवानगी मिळाली असून त्याचे डोस नागरिकांना दिले जात आहेत. 

दोन्ही लशी सुरक्षित
हर्षवर्धन यांनी सांगितलं की, कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड व्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित आहेत. देशात वापर करण्यात येत असलेल्या या लशींच्या सुरक्षिततेबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. ज्या देशांमध्ये लशींबाबत तक्रार आहे तिथले सरकार प्रकरणांची चौकशी करत आहेत .भारतात लसीकरणानंतर दुष्परिणाम दिसतात का यासाठी एक चांगली व्यवस्था तयार करण्यात आली असल्याचंही हर्षवर्धन यांनी सांगितलं. 

जगात कोरोनाचा कहर
भारतात आतापर्यंत 1 कोटी 19 लाख 8 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण मृत्यूची संख्या 1 लाख 61 हजारांच्या वर पोहोचली आहे. भारतातील रिकव्हरी रेट हा इतर देशांपेक्षा चांगला आहे. जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले असून आतापर्यंत कोरोनामुळे तिथे 5 लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये 3 लाखांहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT