PM Narendra Modi esakal
देश

भारताचा लसीकरणात विक्रम; १०० कोटी डोस पूर्ण; लाल किल्ल्यावर सेलिब्रेशन

सकाळ डिजिटल टीम

जानेवारीमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आता १०० कोटींचा टप्पा आज ओलांडला आहे. केंद्र सरकारने हे एक मोठं यश असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहिम सुरु आहे. जगात चीननंतर सर्वात मोठी लसीकरण मोहिम भारतात सुरु आहे. जानेवारीमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आता १०० कोटींचा टप्पा आज ओलांडला आहे. केंद्र सरकारने हे एक मोठं यश असल्याचं म्हटलं आहे. निति आय़ोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी देशातील नागरिकांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

व्ही के पॉल यांनी म्हटलं की, एखाद्या देशाने १०० कोटी डोस ९ महिन्यात पूर्ण करणं हे मोठं काम आहे, देशाचं मोठं यश आहे. देशात जानेवारीमध्ये ९ महिन्यांपूर्वी लसीकरणाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर कमी कालावधीतच देशाने हा टप्पा पार केला.

भारतातील ३० टक्के नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर १० कोटी व्यक्तींना एक डोस देण्यात आला असून दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही. हे काम अजून पूर्ण झालेलं नाही. दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना रिमांइंडर पाठवण्यात आले असल्याची माहितीही डॉक्टर व्हीके पॉल यांनी दिली.

भारताची ओळख ही आत्मनिर्भर अशी असून देशात लस तयार करून १०० कोटी डोस देण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. तसंच पंतप्रधान मोदींनीसुद्धा यासाठी मार्गदर्शन केलं आणि पालकांप्रमाणे काळजी घेतली असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं.

केंद्र सरकारनं याचं सेलिब्रेशन करण्याचं नियोजन केलं आहे. यानिमित्त लसीकरण मोहिमेवर एक नवं गीत आणि ऑडिओ व्हिज्युअल फिल्मचं प्रकाशन होणार आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT