India
India 
देश

सीमेवर 24 तास देखरेख करणारं सॅटेलाईट होणार लाँच; भारताकडून तयारी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. युद्धसामग्री आणि संरक्षणविषयक सामग्रीही मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानावर आधारित आहे. एकीकडे युद्धतंत्र अधिकाधिक तंत्रज्ञानाभिमुख होत चाललेलं असताना अखंड आणि सुरक्षितरित्या कम्यूनिकेशन होणं, हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळेच येत्या दोन-तीन वर्षांमध्ये अनेक उपग्रह अवकाशात सोडण्याचं उद्दीष्ट भारतानं ठेवलं असल्याची माहिती संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी दिली आहे. (Satellite)

हे उपग्रह केवळ कम्यूनिकेशनसाठी नसतील तर ते भारताच्या सीमांवर चोवीस तास देखरेख देखील करणार आहेत. सध्या याच गोष्टीची देशात कमतरता आहे, असंही सूत्रांनी सांगितलंय. काल मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील प्रमुख खरेदी समिती म्हणजेच Defence Acquisition Council - DAC ने स्वदेशी पद्धतीने डिझाईन आणि विकसित केलेल्या GSAT 7B साठी आवश्यकता मान्य केली आहे.

या उपग्रहाचं प्रक्षेपण झाल्यानंतर हा लष्कराचा पहिला असा कम्यूनिकेशन सॅटेलाईट असेल जो फोर्स मल्टीप्लायर म्हणून कार्य करेल युद्ध परिस्थितीमध्ये त्याचा खूप फायदा होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, GSAT 7B सॅटेलाईटची मागणी आर्मीकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. हे सॅटेलाईट येत्या दोन-तीन वर्षांमध्ये लाँच करण्यात येणार आहे. या सॅटेलाईटमुळे कम्युनिकेशन होणं सहज सोपं होणार आहे. नेव्ही आणि एअरफोर्स यांच्यामधीलही कम्युनिकेशन सोपं होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT