Global-index-list 
देश

भारत कल्पक संशोधनात आहे या क्रमांकावर

पीटीआय

नवी दिल्ली - कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आलेली असतानाही भारताने जागतिक कल्पक संशोधन निर्देशांक, २०२० च्या यादीत चार क्रमांकाने वर झेप घेत पहिल्या पन्नासात स्थान पटकावले आहे. जागतिक बौद्धीक संपदा संघटनेने (डब्लूआयपीओ) जाहीर केलेल्या या यादीत भारत ४८ व्या क्रमांकावर आला आहे. गेल्या पाच वर्षांत कल्पक संशोधनात भारताने बरीच प्रगती केल्याचे दिसून आले आहे. 

जागतिक कल्पक संशोधन निर्देशांक यादीत स्वित्झर्लंड प्रथम स्थानावर असून त्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँड यांचा क्रमांक लागतो. गेल्या काही वर्षांत भारत, चीन, फिलीपीन्स आणि व्हिएतनाम या देशांनी बरीच प्रगती केली असून हे चारही देश आता पहिल्या पन्नासात आहेत. जागतिक पातळीवर कल्पक संशोधनाला वेग आला असला तरी कोरोना संसर्गाचा त्यावर निश्‍चितच परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी संशोधन प्रक्रियेत अडथळे आले तर आरोग्य क्षेत्रामध्ये मात्र प्रचंड संशोधन झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही वर्षांत श्रीमंत अर्थव्यवस्थांच्या प्राधान्यक्रमात फारसा फरक पडला नसला तरी आशियातील भारत, चीन, फिलीपीन्स आणि व्हिएतनामसारख्या देशांनी संशोधन क्षेत्रात मोठी प्रगती केली असल्याचे ‘डब्लूआयपीओ’ने म्हटले आहे. पहिल्या दहा जणांमध्ये आशियातील दक्षिण कोरियाने प्रथमच स्थान मिळवले असून सिंगापूर आधीच आठव्या क्रमांकावर आहे. जागतिक कल्पक संशोधन निर्देशांकात पहिल्या तीस देशांमध्ये सर्वच देश उच्चउत्पन्न गटातील असून केवळ चौदाव्या क्रमांकावर असलेला चीन मध्यम उत्पन्न गटातील आहे. या यादीत मलेशिया ३३ व्या क्रमांकावर आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video

Portugal vs Spain : स्वप्न तुटले! ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड कप प्रवास संपला! पोर्तुगालला माजी विजेत्या स्पेनकडून पराभवाचा धक्का

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

SCROLL FOR NEXT