Walter J Lindener_German Envoy 
देश

"भारताची परराष्ट्र सेवा उत्कृष्ट"; जर्मन राजदुतांकडून 'ऑपरेशन गंगा'चं कौतुक

यु्द्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतानं विशेष मोहिम राबवली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (Ukraine War) अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं विशेष मोहिम हाती घेतली आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत ही बचाव मोहिम राबवली जात आहे. भारताच्या या सेवेचं भारतातील जर्मनीचे राजदूत (German Ambassador) वॉल्टर जे लिंडनर यांनी कौतुक केलं आहे. (India foreign service is excellent German Ambassador praises Operation Ganga in Ukraine)

लिंडनर म्हणाले, भारताकडं उत्कृष्ट परराष्ट्र सेवा असून याचा वापर कसा करायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. हे केवळ युक्रेनच्या किंवा युरोपियन युनियनच्या स्थितीबाबत नव्हे तर जागतीक व्यथेबद्दल आहे. आपल्या सर्वांना एकत्रितपणे या स्थितीविरोधात उभं रहायला हवं.

पहिल्या दिवसापासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे खोटं बोलत आहेत. त्यांनी युक्रेनवर केवळ आक्रमण केलेलं नाही तर तिथल्या रशियन भाषिकांना ते बचाव करत आहेत. सध्या युक्रेनमध्ये गोळीबार आणि बॉम्बवर्षाव सुरु आहे. NATO ही एक संरक्षण आघाडी आहे. आम्ही कधीही आक्रमक झालेलो नाही, कधीही कोणावर आक्रमण केलेलं नाही, असंही लिंडनर यांनी म्हटलं आहे.

सध्याची युद्धाची परिस्थिती भयानक असून पुतिन यांनी हे थांबवायला हवं. आमची भूमिका ही इतर युपरोपियन देशांप्रमाणंच आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर रशियन गॅसवरील अवलंबित्व कमी केलं आहे, असंही लिंडनर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT