isro and indian navy conduct key trials for gaganyaan mission
isro and indian navy conduct key trials for gaganyaan mission sakal
देश

Gaganyaan Mission : भारताच्या ‘मिशन गगनयान’ला वेग

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : भारताने बहुचर्चित गगनयान या अवकाश मोहिमेसाठी कंबर कसली असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळवीरांसाठीच्या कुपीच्या येथील ‘वॉटर सर्व्हायव्हल टेस्ट फॅसिलिटी सेंटर’मध्ये प्रारंभिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

केरळच्या कोची येथील नौदलाच्या केंद्रामध्ये या कुपीच्या चाचण्या घेतल्या जात असल्याचे ‘इस्रो’कडून सांगण्यात आले. या रिकव्हरी मोहिमेमध्ये अन्य सरकारी संस्था देखील सहभागी झाल्या आहेत.

भारताची गगनयान ही मोहीम तीन दिवसांची असेन या मोहिमेच्या माध्यमातून तीन अंतराळवीरांना पृथ्वीच्या चारशे किलोमीटरपर्यंतच्या कक्षेमध्ये नेण्यात येईल आणि तिथून त्यांना पृथ्वीवर सुरक्षित आणले जाणार आहे.

पृथ्वीवर परतत असताना ही कुपी भारतीय समुद्रामध्ये उतरेल. अगदी कमीतकमी वेळेमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांना ही कामगिरी पार पाडावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. विविध परिस्थितीमध्ये ही रिकव्हरी योग्य पद्धतीने पार पडावी म्हणून कुपीच्या अनेक चाचण्या घेतल्या जातात.

भारतीय अंतराळवीर आणि कुपी किती कालावधीत पूर्ववत होते त्यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यातील चाचण्या या बंदिस्त तलावामध्ये घेण्यात आल्या असल्या तरी यानंतरच्या चाचण्या मोकळ्या समुद्रात घेण्यात येतील, असे ‘इस्रो’कडून सांगण्यात आले.

फिडबॅकनंतर होणार सुधारणा

या चाचण्यानंतर अंतराळवीरांकडून जो फिडबॅक आणि माहिती मिळेल त्याचा लाभ प्रमाणित कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी होईल, त्याच्या आधारेच उपकरणांमध्ये सुधारणा करण्यात येतील तसेच प्रशिक्षणाचा आराखडा देखील निश्चित करण्यात येईल असे ‘इस्रो’ने म्हटले आहे. भविष्यातील प्रभावशाली प्रक्षेपक तयार करण्यासाठी त्या अनुषंगाने ‘विकास’ या इंजिनाच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. या थ्रॉटेबल इंजिनाच्या चाचण्यांतून सकारात्मक निष्कर्ष हाती आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयुष चावलाने हैदराबादला दिला मोठा दणका! धोकादायक ट्रेविस हेडला धाडलं माघारी

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT