India to get loan of $1.5 billion from Asian Development Bank 
देश

आशियाई विकास बँकेनं भारताला मदत करणार; १.५ अब्ज डॉलर्सचं देणार कर्ज

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आशियाई विकास बँकेनं कोरोना व्हायरस विरोधात सुरू असलेल्या लढाईत आर्थिक संसाधनांना मदत करण्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं आहे. या संकटकाळात संघटना भारत सरकारच्या सर्व कामांना समर्थन देण्यासाठी कटिबद्ध आहे. हे कर्ज या संकटात त्वरित आवश्यक असलेल्या मदतीसाठी आहे, असे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासात्सुगु असाकावा यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असाकावा म्हणाले, 'करोनाविरोधात भारत करत असलेल्या प्रयत्नांत भारताची मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशातील गरीब आणि वंचितांपर्यंत प्रामुख्यानं ही मदत पोहोचली पाहिजे. आशियाई विकास बँकेनं गरजू देशांच्या मदतीसाठी कोविड-१९ अॅक्टिव्ह रिस्पॉन्स अँड एक्स्पेंडेचर प्रोग्राम (केअर्स) हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून या देशांना बँकेकडून कर्ज देण्यात येत आहे. याद्वारे संबंधित देशातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शेतकरी, आरोग्य कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगारांसह आठ कोटींहून अधिक लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यात येणार आहे'.

Coronavirus : 'या' तारखेपासून भारतात होणार रोज एक लाख टेस्ट; आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोनावर नियंत्रण मिळवणं, त्यापासून बचाव करणं आणि गरीब, तसंच आर्थिकरित्या मागासलेल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी हे कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. त्वरित वितरित करण्यात येणारा निघी म्हणजे आशियाई विकास बँकेकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या पॅकेजचा एक भाग आहे, असं असाकावा यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT