pm modi 
देश

आयटी इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा बदल; केंद्र सरकारकडून नियम शिथिल

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारताच्या दूरसंचार विभागाने आयटी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बीपीओ आणि वर्क फ्रॉम होम बाबत कोरोनाकाळात देण्यात आलेली सूट आता कायमस्वरुपी लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग तसंच आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी काही नियमांमधून सूट दिली आहे. यामुळे उद्योगाला प्रोत्साहन मिळेल आणि वर्क फ्रॉम होमसाठी मदत होईल असं म्हटलं आहे

नव्या नियमांनुसार सेवा देणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम एनीव्हेअर करता येईल. या कंपन्यांना वेळेवर रिपोर्ट करणं आणि इतर बंधनांतून मुक्त करण्यात आलं आहे.  ओएसपी अशा कंपन्या आहेत ज्या दूरसंचार साधनांचा वापर करून अॅप्लिकेशन सेवा, आयटीशी संबंधित सेवा किंवा इतर प्रकारच्या आउटसोर्सिंग सेवा पुरवते. अशा कंपन्यांना बीपीओ, नॉलेज प्रोसेसिंग आउटसोर्सिंग, आयटीइएस आणि कॉल सेंटर म्हटलं जातं. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार वर्क फ्रॉम होम संकल्पनेला यामुळे प्रोत्साहन मिळेल आणि याचा विस्तार वर्क फ्रॉम एनीव्हेअर असा करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.

केंद्र सरकारने म्हटलं की, काही अटींवर वर्क फ्रॉम होमला मंजुरी देण्यात आली आहे. यात घरातून काम करत असलेल्या एजंटला ओएसपी केंद्राचा रिमोट एजंट मानलं जाईल आणि इंटरकनेक्शनची परवानगी असेल. रिमोट एजंटला देशातील कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची मुभा असेल.

नव्या नियमांचा उद्देश उद्योगाला प्रोत्साहन देणे हा आहे. भारताला आयटी क्षेत्रात एक चांगलं स्थान मिळवून द्यायचं आहे. नव्या नियमांमुळे कंपन्यांना वर्क फ्रॉम होमशी संबंधित व्यवस्था उभारण्यास आणि त्यांच्या पद्धतीने काम करण्यास मदत मिळेल असंही म्हटलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी 'खेळी'! ठाकरे गटातील खासदार शिंदेसेनेत येणार? एकनाथ शिंदेंची दिल्लीत गुप्त रणनीती

सुरज चव्हाण होणार बाबा? बायकोच्या 'त्या' पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष, Viral Video

120000000000! राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकणे आहे; भारताची मोठी कंपनी तगडी रक्कम मोजून बनणार मालक, ४ स्पर्धक शर्यतीत

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात! कोथरुड, बाणेर भागात ढगांचा गडगडाट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT