US Report on Indian Media e sakal
देश

भारतात सरकारी अधिकारी माध्यमांना धमक्या देतात : अमेरिका रिपोर्ट

सकाळ डिजिटल टीम

भारतीय स्थानिक आणि राष्ट्रीय दोन्ही स्तरावरील सरकारी अधिकारी महत्त्वाच्या मीडिया संस्थांना (India Media Organization) धमक्या देऊन भीती दाखवण्याचे काम करतात, अशी माहिती अमेरिकेच्या एका अहवालातून समोर आली आहे. 'कंट्री रिपोर्ट ऑन मानवी हक्क प्रॅक्टिसेस 2021' असा अहवाल अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाकडून (US States Department) जारी करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या अहवालात भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अहवालात म्हटले आहे की, ''भारतात स्वतंत्र्य मीडिया सक्रीय आहे आणि सर्वसाधारणपणे वेगवेगळे विषय लावून धरतात. पत्रकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून अशी माहिती मिळाली, की स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील सरकारी अधिकारी मोठ्या माध्यम संस्थांना विविध मार्गांनी धमकाविण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मालकांवर दबाव आणणे, प्रायोजकांना लक्ष्य करणे, बनावट खटले दाखल करणे आणि काही प्रकरणांमध्ये मोबाईल टेलिफोन आणि इंटरनेट सारख्या सेवा बंद करणे, अशा प्रकारांचा समावेश आहे.''

भारतातील स्वयंसेवी संस्थांचा हवाला देत, सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना धमकावण्यासाठी फौजदारी खटला दाखल करून त्यांचा तपास करण्यात आला, असा आरोप देखील अमेरिकेने या अहवालातून केला आहे.

दरम्यान, अनेकदा माध्यमांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप सरकारवर झाला आहे. तसेच पत्रकारांचे फोन टॅपिंगचे प्रकरण देखील समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पेगासस प्रकरण उघडकीस आले होते. पेगाससच्या माध्यमातून देशातील मोठ्या पत्रकारांवर पाळत ठेवली जात होती, असा आरोप देखील करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT