Navy personnel  
देश

कतारमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्यांसाठी केंद्राचं महत्त्वाचं पाऊल

आठ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी भारत सरकारने कतार सरकारकडे अपिल केला आहे. हेरगिरी प्रकरणी आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांना मागील वर्षी कतारमध्ये अटक झाली होती

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आठ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी भारत सरकारने कतार सरकारकडे अपिल केला आहे. हेरगिरी प्रकरणी आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांना मागील वर्षी कतारमध्ये अटक झाली होती.याप्रकरणी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंद बागची म्हणाले की, दिल्लीकडून यापूर्वीच शिक्षेविरोधात अपिल करण्यात आला आहे.

आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याच्या घटनेने भारताने धक्का बसला असल्याचं म्हटलं होतं. यावर बोलताना बागची म्हणाले की, याप्रकरणाची संपूर्ण माहिती मिळालेली नाही. निर्णयासंबंधी डिटेल्स गोपनीय ठेवण्यात आले आहेत. फक्त कायदेशीर टीमला याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी आपण कायदेशीर प्रक्रिया राबवत आहोत. ( India has filed an appeal with Qatar over the death penalty to eight former Navy personnel )

आम्ही माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत संपर्कात आहोत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. आम्ही शक्य ती कायदेशीर आणि वाणिज्य दुतांमार्फत मदत करत आहोत. हे खूप संवेदनशील प्रकरण आहे, असं बागची यावेळी म्हणाले. मंगळवारी माजी नौदल अधिकाऱ्यांनी वाणिज्य दुतासोबत संपर्क साधला होता, असंही ते म्हणाले.

कतारकडून भारतीय नौदलात काम केलेल्या आठ माजी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीये. याआधी ते दाहरा ग्लोबल टेकनॉलॉजी आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांना कतारमध्ये अटक झाली. या सर्वांवर इजिप्तसाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

माजी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी कतार सरकारने केलेले आरोप फेटाळले आहेत. ते कतारमध्ये हेरगिरी करण्यासाठी गेले नव्हते. नौदल उभारणी आणि देशाच्या सुरक्षेसंबंधी निर्मितीसाठी ते तेथे गेले होते. ते कधीच हेरगिरी करु शकत नाहीत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं कुटुंबीयांकडून म्हणण्यात आलंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT