Covid-19 News
Covid-19 News Esakal
देश

Covid-19 News: नवीन वर्षात आणखी वाढणार कोरोनाचा धोका? मे महिन्यानंतर पहिल्यांदाच रूग्णसंख्येत मोठी वाढ

अंकिता खाणे (Ankita Khane)

Covid-19 News: देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. देशात कोरोना संसर्गाची दिवसेंदिवस वाढणारी प्रकरणे आता आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढवत आहेत. गेल्या 10 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर दररोज सरासरी 500-600 नवीन प्रकरणे समोर येत आहेत. रविवारी (31 डिसेंबर) सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अपडेट केलेली आकडेवारी आणखीनच भितीदायक आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 चे 841 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे 227 दिवसांतील सर्वाधिक आहे. यासह सक्रिय प्रकरणांची संख्या आता 4,309 झाली आहे. उल्लेखनीय आहे की, यापूर्वी १९ मे रोजी ८६५ प्रकरणे समोर आली होती.

2019 मध्ये या वेळी कोरोना महामारीला सुरुवात होऊन चार वर्षे झाली आहेत, परंतु त्याचा धोका अजूनही कमी होताना दिसत नाही. चार वर्षांत देशभरात 4.5 कोटींहून अधिक लोकांना संसर्ग झाला आणि 5.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

आरोग्य तज्ञ कोरोनाचे नवीन JN.1 प्रकार हे सध्याच्या संसर्ग प्रकरणांचे मुख्य कारण मानत आहेत. अभ्यासात, त्याच्या संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जाते, याशिवाय, हा प्रकार शरीरात लस-संसर्गामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती कमी करून लोकांमध्ये संसर्ग सहज वाढवतो, त्याबाबत शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.

रिकव्हरी रेट चांगला

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, बहुतेक संक्रमित लोक सहज बरे होत आहेत ही दिलासादायक बाब आहे. बहुतेक लोकांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटींहून अधिक आहे, रिकव्हरी रेट 98.81 टक्के आहे. याशिवाय, देशात आतापर्यंत लसीचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत, ज्यामुळे गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यात मदत होत आहे.

दरम्यान, JN.1 व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. मिळालेल्या माहतीनुसार, लसीचा बूस्टर डोस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग झाल्याचे आढळले आहे, हा धोका लक्षात घेता, तज्ज्ञांनी नागरिकांना नियमावलीचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT