देश

भारताची पुढील 25 वर्षांसाठीची उद्दिष्ट्ये निश्चित : मोदी

भारताने 2070 पर्यंत नेट-झिरोचे उद्दिष्ट ठेवले असल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद - भारताने पुढील 25 वर्षांसाठी नवीन उद्दिष्टे निश्चित केली असून, त्यावर काम देखील सुरु केले आहे. त्याचप्रमाणे, ICRISAT साठी देखील पुढील 25 वर्षे तितकीच महत्त्वाची असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. ते हैदराबादमधील पाटनचेरू येथे इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी-अरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) च्या 50 व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. भारतातील 80-85% शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत. या लहान शेतकऱ्यांसाठी हवामान बदल ही मोठी समस्या असून, भारताने 2070 पर्यंत नेट-झिरोचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावेळी मोदींनी 'पर्यावरणासाठी जीवनशैली'ची गरजही अधोरेखित केली.

शेतकर्‍यांना हवामानाच्या आव्हानापासून वाचवण्यासाठी, आमचा प्रयत्न असून, देशातील 80% पेक्षा जास्त लहान शेतकऱ्यांवर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेतीवर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले. ICRISAT कडे इतर राष्ट्रांना शेती सुलभ आणि शाश्वत करण्यासाठी मदत करण्याचा 5 दशकांचा अनुभव आहे. ते भारताच्या 'कृषी' क्षेत्राला बळकट करण्यासाठी त्यांचे कौशल्य प्रदान करत राहतील अशी आशा देखील मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT