देश

अण्वस्त्र सज्जतेत भारत पाकिस्तानच्या मागे; रशियाकडे सर्वाधिक शस्त्रे

विनायक होगाडे

नवी दिल्ली : अण्वस्त्र सज्जतेत भारत त्याच्या शेजारी व परंपरागत स्पर्धक देश चीन व पाकिस्तानपेक्षा मागे आहे. तरी युद्धाची वेळ आलीच तर या दोन्ही देशांना अस्मान दाखविण्याची क्षमता भारतात असून ‘अग्नी-५’ शस्त्रास्त्र आणि राफेल हे लढाऊ विमानाबरोबरच आण्विक क्षमतेने परिपूर्ण असलेली ‘आयएनएस अरिहंत’ ही पाणबुडीही संरक्षण दलात सहभागी झाली आहे. (India lags behind Pakistan in nuclear weapons preparedness Russia has the most weapons)

‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (एसआयपीआरपी- सिपरी) या संस्थेने जगभरातील आण्विक शस्त्रांची आकडेवारी सोमवारी (ता.१४) जाहीर केली. ‘सिपरी इयरबुक २०२१’या अहवालातील माहितीनुसार यंदा जानेवारी महिन्यापर्यंत चीनकडे ३५०, पाकिस्तानकडे १६५ आणि भारताकडे १५६ आण्विक शस्त्रास्त्रे असल्याची नोंद आहे. जगातील नऊ देश अण्वस्त्र सज्ज आहेत. हे सर्व देश मिळून सध्या १३ हजार ८० आण्विक शस्त्र आहेत. यामध्ये रशिया अव्वल असून त्यांच्याकडे सहा हजार २५५ अण्वस्त्र आहेत. ‘सिपरी’ने केलेल्या मूल्यांकनानुसार अण्वस्त्र सज्जतेत रशिया पहिल्या व अमेरिका पाच हजार ५५० अण्वस्त्रांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील एकूण आण्विक शस्त्रांपैकी ९० टक्के शस्त्रसाठा या दोन्ही बलाढ्य देशांमध्ये आहे. या दोन्ही देशांसह ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्राईल आणि उत्तर कोरिया हे देशही आण्‍विक शस्त्रांनी संपन्न आहेत.

फ्रान्सकडे २९०, ब्रिटनकडे २२५ आण्विक शस्त्रे असून इस्राईल-९०, उत्तर कोरियात ४० ते ५० एवढी संख्या आहे. प्रत्येक देश त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम गुप्त ठेवत असल्याने ही आकडेवारी अचूक असेल, असा दावा करता येणार नाही, असेही यात म्हटले आहे.

अण्वस्त्रांमध्ये भर

पूर्व लडाखमध्ये भारत व चीनमध्ये गेल्या वर्षापासून संघर्ष सुरू आहे अशा वेळी ‘सिपरी’चा हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ‘रशिया व अमेरिका वग‍ळता अन्य अण्वस्त्रसज्ज देशांत अजूनही आण्विक शस्त्रे तयार होत असून ती तैनात करण्यात येत आहेत. अण्वस्त्रांच्या साठ्यात भर टाकण्यात आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने निम्मी वाटचाल चीनने केली आहे, भारत व पाकिस्तानही त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा विस्तार करीत आहे,’ असे ‘सिपरी’ने म्हटले आहे.

एचईयू व प्लुटोनियमची निर्मिती

आण्विक शस्त्रांमध्ये अणुभंजनासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांचा आढावाही ‘सिपरी’च्या अहवालात घेतला आहे. हे घटक म्हणजे अत्यंत समृद्ध युरेनियम (एचईयू) आणि विभक्त प्लुटोनियमच्या रुपात असून भारत व इस्त्राईल मुख्यतः प्लुटोनियम तयार करतात. पाकिस्तानमध्ये ‘एचईयू’ची निर्मिती होत असली तरी प्लुटोनियमच्या बनविण्याची क्षमतेत ते वाढ करीत आहेत. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे देश ‘एचईयू’ आणि प्लुटोनियम दोन्ही तयार करतात, असे यात म्हटले आहे.

अहवालातील नोंदी

- अण्वस्त्रांची चाचणी केल्याचे भारत व पाकिस्तान सरकारकडून जाहीर केले तरी त्याचा आकार व स्थितीबाबत माहिती दिलेले नाही

- जगातील १३ हजार ८० अण्‍वस्त्रांपैकी दोन हजार शस्त्रे कायम तैनात ठेवलेली असतात

- सौदी अरेबिया, भारत, ऑस्ट्रेलिया, इजिप्त आणि चीन हे २०१६ ते २०२०मधील पाच मोठे शस्त्र आयातदार देश

- जागतिक पातळीवरील सौदीची आयात ११ टक्के तर भारताची ९.५ टक्के

अण्वस्त्रांची संख्या

  • १३, ०८० - एकूण

  • ६, २५५ - रशिया

  • ५, ५५० - अमेरिका

  • २९० - फ्रान्स

  • २२५ - ब्रिटन

  • ३५० - चीन

  • १६५ - पाकिस्तान

  • १५६ - भारत

  • ९० - इस्राईल

  • ४० ते ५० - उत्तर कोरिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT