Leopard in India eSakal
देश

Leopard in India : देशातील बिबट्यांच्या संख्येत वाढ; मध्य प्रदेश प्रथम, तर महाराष्‍ट्र दुसऱ्या स्थानी

India Leopard Census : देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १३,८७४ असल्याचे जाहीर केले आहे. बिबट्यांच्या प्रगणनेचा पाचवा अहवाल प्रकाशित झाला.

सकाळ वृत्तसेवा

India Leopard Population : केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने आज देशातील संरक्षित क्षेत्रांतील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. त्यात मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक असून महाराष्ट्र दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.

देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १३,८७४ असल्याचे जाहीर केले आहे. बिबट्यांच्या प्रगणनेचा पाचवा अहवाल प्रकाशित झाला. हा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था यांनी देशातील विविध राज्यांच्या वन विभागांच्या मदतीने तयार केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १,९८५ असल्याचे सांगण्यात आले आहे. (Maharashtra Leopard Population)

२०१८ साली ही संख्या १,६९० होती. या संख्येत १२२ बिबट्यांची भर पडली आहे. राज्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या एकूण संख्येपैकी जवळपास ७५ टक्के संख्या ही संरक्षित वनक्षेत्राबाहेर राहत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद अहवालात नमूद आहे. विदर्भातील पेंच, बोर, नवेगाव नागझिरा, मेळघाट आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांच्या अधिवासाची घनता २०१८ च्या तुलनेत वाढली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्या अधिवासाच्या घनतेमध्ये वाढ झाल्याचेही अहवालात नमूद आहे.

कोणत्या राज्यात किती संख्या?

  • मध्य प्रदेश - ३,९०७

  • महाराष्ट्र - १,९८५

  • कर्नाटक - १,८७९

  • तामिळनाडू - १,०७०

  • छत्तीसगड - ७२२

  • राजस्थान - ७२१

  • उत्तराखंड - ६५२

  • उत्तर प्रदेश - ३७१

  • तेलंगाणा - २९७

  • बिहार - ८६

  • झारखंड - ५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Post Office : तुम्हाला वर्षभरात लखपति बनवू शकते पोस्टाची ही स्कीम! थोडीशी गुंतवणूक करून झटपट व्हाल श्रीमंत?

Video: प्राजक्ता–गश्मीर पुन्हा एकत्र येणार? व्हिडिओ शेअर करत केल्या मोठ्या घोषणा, म्हणाले...'फुलवंतीनंतर आता...'

SCROLL FOR NEXT