Corona Virus 
देश

Corona Virus: कोरोना महामारीमुळे भारतीयांचे आयुर्मान 'इतक्या' वर्षांनी झाले कमी; संशोधनातील दावा केंद्राने फेटाळला

India life expectancy decline: मुस्लीम, आदिवासी जमाती आणि इतर मागास समाजावर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. याशिवाय अभ्यासामध्ये असाही दावा करण्यात आलाय की, महिलांपेक्षा पुरुषांवर याचा कमी परिणाम झाला.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग अडचणीत सापडलं होतं. लोकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या, व्यवहार ठप्प झाले होते. अनेकांना आपल्या प्रियजनांना गमावावं लागलं होतं. एकंदरीत कोरोना महामारीचा प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम झाला. पण, एका नव्या अभ्यासात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या नव्या अभ्यासामध्ये असं सांगण्यात आलंय की, कोरोना महामारीमुळे २०२० भारतीयांचे आयुर्मान जवळपास अडीच वर्षांनी कमी झालं आहे.

अकॅडेमिक जर्नल साईन्स अडवान्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, कोरोना महामारीमुळे २०१९ ते २०२० या काळात भारतीयांचे आयुर्मान २.६ वर्षांनी कमी झाले आहे. मुस्लीम, आदिवासी जमाती आणि इतर मागास समाजावर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. याशिवाय अभ्यासामध्ये असाही दावा करण्यात आलाय की, महिलांपेक्षा पुरुषांवर याचा कमी परिणाम झाला. पुरुषांचे आयुर्मान २.१ वर्षांनी तर महिलांचे आयुर्मान ३.१ वर्षांनी कमी झाले आहे.

केंद्र सरकारने मात्र हे नवे संशोधन फेटाळून लावले आहे. संशोधन असमर्थनीय आणि स्वीकार करण्यासारखे नाही, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. संशोधनामध्ये अनेक दोष असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. तसेच, संशोधन करताना योग्य विदा वापरण्यात आलेली नाही, तसेच संशोधन अपूर्ण असल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा पुरुष आणि वृद्ध व्यक्तींवर दिसून आला होता. पण, संशोधनामध्ये महिलांवर जास्त परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून संशोधनात केलेल्या जेंडरसंबंधी अभ्यास चुकीचा असल्याचं स्पष्ट होतं, असं देखील आरोग्य मंत्रालयाकडून म्हणण्यात आलं आहे. विश्वास ठेवण्यासारखं संशोधनात काहीही नाही अशी भूमिका मंत्रालयाने घेतली आहे.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु झाला होता. त्यानंतर तो हळूहळू संपूर्ण जगात पसरला. भारतामध्ये देखील त्याने हातपाय पसरले. कितीची खबरदारी घेतली तरी कोरोना झपाट्याने पसरत होता. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारण्यात आला होता. कडकडीत लॉकडाऊन केल्यामुळे काही ठिकाणी फायदा झाला. वर्षभराच्या प्रयत्नानंतर कोरोना प्रतिबंध लस बाजारात आली आणि त्यानंतर चित्र काहीसे बदलू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT