india news Narendra Modi news Most popular political  leader facebook
india news Narendra Modi news Most popular political leader facebook  
देश

फेसबुकवर नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुकवर चार कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्ससह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे. 

'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेसबुकवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते ठरले आहेत. या चार कोटी फॉलोअर्समध्ये मोदी यांच्या पेजला तीन कोटी, तर पंतप्रधान कार्यालयाच्या पेजला एक कोटी फॉलोअर्सचा समावेश आहे. मे 2014 मध्ये मोदी यांनी पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली त्यावेळी त्यांच्या पेजला केवळ 40 लाख फॉलोअर्स होते. तीन वर्षांमध्ये हा आकडा चार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. फॉलोअर्सच्या बाबतीत मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले आहे. मोदी यांच्या डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत या योजना सोशल मिडियावर लोकप्रिय ठरल्या आहेत. सार्वजनिक प्रशासनामध्ये सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्याची ही नवीन पद्धत आहे, अशा प्रतिक्रिया फेसबुकचे भारतातील संचालक अंखी दास यांनी सांगितले आहे. 

मोदी यांच्यानंतर भारतात सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, जनरल व्ही के सिंह, पियुष गोयल आणि अरुण जेटली यांचा समावेश आहे. केंद्रीय महिती व प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, रेल्वे मंत्रालय यांच्याकडून फेसबुकद्वारे लोकांशी संवाद साधून, फेसबुक लाईव्हच्या सेवेचा वापर करून सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्यास प्रतिसादही चांगला मिळत आहे. दास यांच्या सांगण्यानुसार, फेसबुकद्वारे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत जवळपास सहा हजार सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 
 

ताज्या बातम्याः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT