देश

…म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर PM मोदींचा फोटो; केंद्राने दिलं उत्तर

सकाळ वृत्तसेवा

कोरोना प्रतिबंधक लस प्रमाणपत्रावर छापण्यात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. विरोधकांनी यावरुन केंद्रावर टीका करुन घेरण्याचा प्रयत्नही केला. लस प्रमाणपत्रांवर मोदींचा फोटो छापण्याची गरज काय? हा प्रश्न सर्वसामान्य भारतीयांनाही पडला आहे. यावर आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण आलं आहे. कोरोना प्रतिबंधक लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो आणि त्यासोबतचा संदेश छापण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मंगळवारी लोकसभेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार (Dr Bharti Pawar) यांनी ही माहिती दिली.

करोना लसीकरण प्रमाणपत्रावर छापण्यात येणाऱ्या मोदींच्या फोटोसंदर्भात काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी मंगळवारी संसदेमध्ये प्रश्न विचारला होता. लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो छापणं हे गरजेचं आणि अनिवार्य आहे का? असा प्रश्न केतकर यांनी संसदेत उपस्थित केला होता. यावर आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उत्तर दिलं आहे. प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो आणि त्यासोबतचा संदेश छापण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू आहे. लसीकरणानंतरही कोरोना महामारी संदर्भातील नियम पाळावेत, हे लोकहिताच्या दृष्टीने महत्वाचं आहे, हाच संदेश देण्यासाठी मोदींचा फोटो या प्रमाणपत्रावर छापण्यात आल्याचं भारती पवार यांनी स्पष्ट केलं.

कोरोना लस घेतल्यानंतरही धोका संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी नियम आणि अटी पाळणं गरजेचं आहे. करोनाला आळा घालायचा असल्यास नियमांचं पालन करणं, हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि त्यासोबतच्या संदेशामधून जागृती केली जात आहे. हे सर्व व्यापक लोकहिताच्या दृष्टीने केलं जात असल्याचे भारती पवार यांनी सांगितलं. अशाप्रकारचे महत्वाचे संदेश लोकांपर्यंत जास्तीत जास्त परिणामकारक पद्धतीने पोहचावेत ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असंही त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: 'चाहत्यांसाठी आधी धोनी अन् मग CSK, जडेजाही वैतागतो', चेन्नईच्याच माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

SCROLL FOR NEXT