coronavirus 
देश

कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत भारत,चीनलाही पुढच्या १-२ दिवसांत मागे टाकेल?

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनाचा फैलाव आटोक्यात येण्याची चिन्हे नसून आता तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत भारत, चीनलाही मागे टाकेल अशी भीती वर्तविण्यात येत आहे. देशात गेल्या २४ तासांत आणखी ३६०४ कोरोनाग्रस्त आढळले असून ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

देशात कोरोनाचा मृत्यूदर आजही सर्वांत कमी असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी आज पुन्हा अधोरेखित केले. लाॅकडाउनमधून एक एक क्षेत्र वगळताना देशातील लोकसंख्येची घनता पाहता कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाने वर्तविली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगात अमेरिका, स्पेन, ब्रिटन,, रशिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्राझील, तुर्कस्तान व इराण हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त देश आहेत. चीन या पहिल्या दहा देशांच्या यादीतून कधीच बाहेर पडला असून, सध्या तो रूग्णसंख्येबाबत जगात ११ व्या क्रमांकावर आहे. मे महिन्यात भारतातील रूग्णसंख्या ज्या झपाट्याने वाढली त्यानंतर लगेचच म्हणजे १२ व्या क्रमांकावर भारत आहे. देशात सध्या रोज १ लाख चाचण्या केल्या जातात. मात्र १३५ कोटींच्या देशासाठी या गतीने चाचण्या होत राहिल्यास साऱ्या नागरिकांच्या चाचण्या होण्यासाठी ३७ वर्षे लागतील असे स्पष्ट गणित आहे. त्यादृष्टीने चाचण्या वाढविण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. 

भारतातील सध्याची रूग्णसंख्या ७०, ७५६ आहे व चीनची अधिकृत आकडेवारी ८२,९१८ आहे. यात चीनमध्ये रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळविल्याचे दिसत आहे तर भारतात आता कोरोना संक्रमणाचा वेग अतिशय तीव्र झाला आहे. रोज किमान तीन हजारांची वाढ होण्याचा कल कायम राहिला तर, पुढच्या १-२ दिवसांत भारत रूग्णसंख्येबाबत चीनलाही मागे टाकण्याची शक्यता वर्तविली जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

Pune News: लोहगड दरीत तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; ४० हून अधिक साक्षीदार, डिजिटल पुराव्यांची सांगड

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

SCROLL FOR NEXT