देश

Video : सैनिकांचे मृतदेह गोळा करण्यासाठी पाकने फडकवले पांढरे निशाण; पाहा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवानांनी अद्दल घडवली आहे. प्रत्यक्ष ताबा झालेल्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवले आहे. लष्कराकडून या घठनेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी नेत्यांकडून युद्धाची भाषा केली जात आहे. पण, ताबा रेषेवरील चकमकीतही पाकिस्तानला पांढरे निशाण फडकवावे लागत आहे.

दोन पाक सैनिकांना केले ठार
भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानातून सातत्याने कुरघोड्या होत असतात. भारतीय चौक्यांवर गोळीबार ही पाकिस्तानी सैन्याचा जणू रोजचाच कार्यक्रम असतो. पण, भारताकडून त्या गोळीबाराला नेहमी चोख प्रत्युत्तर दिले जाते. ताबा रेषेवर १० आणि ११ सप्टेंबर दरम्यान, पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय सैन्याने नेहमप्रमाणे चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. पाकिस्तानी चौकीच्या बाजूलाच त्यांचे मृतदेह पडले होते. पण, ते मृतदेह परत घेणेही पाकिस्तानी सैनिकांना अशक्य होते. भारताकडून गोळ्यांचा वर्षाव होत असल्याने पाकिस्तानी सैनिकांना मृतदेह मागे घेण्यासाठी पुढे येण्याचे धाडस ही नव्हते. अखेर, पाकिस्तानी चौकीतून पांढरे निशाण दाखवण्यात आले. त्यानंतर भारतीय चौकीतून गोळीबार थांबवण्यात आला आणि पाक सैनिकांनी त्यांच्या सैनिकांचे मृतदेह घेतले.

पाकला युद्ध न परवडणारे
पाक सैनिकांनी पांढरे निशाण दाखवल्याचा व्हिडिओ भारतीय लष्कराने शेअर केला आहे. ट्विटरवर एएनआयने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर याच्या रिअॅक्शन्स येऊ लागल्या आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेला एअर स्ट्राईक, पुन्हा जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्याचा निर्णय यानंतर पाकिस्तानातून युद्धाची भाषा वापरली जात आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानच्या भाषेत नरमाई आली आहे. पाकिस्तान सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटात असताना त्यांना युद्ध परवडणारे नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : पारंपारिक पोशाखात महिला, तरुण तरुणींनी काढली महाडमध्ये शोभा यात्रा

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT