देश

बिछडे भाई फिर मिले! तब्बल 75 वर्षांनी पुन्हा भेटले अन् मिठी मारून ढसाढसा रडले

फाळणीच्या वेळी हरवलेले दोन सख्खे भाऊ पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

देशाच्या फाळणीवेळी अनेकजण विभागले गेले. काहीजण हरवले तर कित्येक जणांना जीवाला मुकावे लागले. दरम्यान, फाळणीवेळी हरवलेले दोन सख्खे भाऊ तब्बल ७५ वर्षांनी भेटले आहेत. सिक्का आणि त्याचा मोठा भाऊ सादिक खान हे फाळणीवेळी वेगळे झाले होते. फाळणीवेळी झालेल्या दंगलीत त्यांच्या वडिलांचा आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. १० वर्षाच्या सादिक जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या दिशेने पळून गेला होता. या घटना आईला सहन न झाल्याने तिनेही आत्महत्या केली होती.

भारताच्या फाळणीचा सर्वात मोठा फटका पंजाबला बसला होता. दरम्यान, या फाळणीत विभक्त झालेले सिक्का यांनी एक प्रसंग सांगितला आहे. भटिंडा येथील माझे घर मला आठवते. गावातील लोकांनी आणि काही नातेवाईकांनी मला मोठे केले ​​आहे. मात्र या सगळ्यात मला माझ्या भावाबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. मी मागील अनेक वर्षांपासून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण मला यश मिळत नव्हते.

पाकिस्तानच्या यूट्यूबर नसीर ढिल्लोने त्यांची मदत केली आणि सादिन खान सापडले. ३८ वर्षीय ढिल्लो हा पाकिस्तानी शेतकरी आणि रिअल इस्टेट एजंट आहे. तो आणि त्याचा शीख मित्र भूपिंदर सिंग यांनी आतापर्यंत 300 विभक्त कुटुंबांना एकत्र करण्याचे काम केले आहे. ढिल्लो आणि भूपिंदर सिंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा विभक्त झालेल्यांना एकत्र करण्याचे काम करत आहेत.

सादिक आणि सिक्का पाकिस्तानातील करतारपूरमध्ये भेटले. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडत असतानाही 2019 मध्ये हा कॉरिडॉर उघडण्यात आला होता आणि याच ठिकाणी या भावांची भेट झाली होती. आम्ही दोघे भेटलो तेव्हा अश्रू आवरले नाहीत. दोन्ही देश लढत आहेत. भारत-पाकिस्तानच्या राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना फाळणीचा फटका आमच्या कुटुंबाला बसला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT