Corona_Vaccine
Corona_Vaccine 
देश

कोरोनाच्या लसीसंदर्भात मोठी बातमी!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनावर लस निर्मितीसाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोनावरील लस यशस्वी ठरल्याचे समोर आले. ही बातमी भारतातच नाही तर संपूर्ण जगासाठी दिलासादायक ठरली आहे. पण आता या लसीची तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी भारतातील पाच ठिकाणी तयारी पूर्ण करण्यात आली. 

ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका यांनी कोरोनावरील लस विकसित केली आहे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे (डीबीटी) सचिव रेणू स्वरूप यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. ते म्हणाले, की मानवी चाचणी ही एक आवश्यक बाब आहे. कारण भारतीयांना लस देण्यापूर्वी त्याबाबतची आकडेवारी माहिती असली पाहिजे. भारतातील प्रत्येक कोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात भागीदार आहे. आता डीबीटीकडून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ठिकाणांची तयारी केली जात आहे. आम्ही याबाबतचे काम आधीच सुरू केले होते. आता आम्ही वैद्यकीय चाचणीसाठी पाच ठिकाणांचा उपयोग करत आहोत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, ऑक्सफर्ड आणि त्याचे भागीदार असलेल्या एस्ट्राजेनेका यांनी लस यशस्वी होत असल्याचे दिसत असल्याने त्याच्या उत्पादनासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे. 

कोरोनावरील लस सुरक्षित

कोरोनावर ऑक्सफर्ड विद्यापीठाने जी लस विकसित केली आहे, ती लस सुरक्षित दिसत आहे. प्रभावी परिणामही आता दिसून आले आहेत, असा दावा संशोधकांनी केला. 

पाच ठिकाणी होणार मानवी चाचणी

कोरोना व्हायरसवर लस निर्मितीसाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाला यश आले असून, आता या व्हायरसवरील लसीची अंतिम मानवी चाचणी भारतातील पाच ठिकाणी केली जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT