India records 3016 new corona cases 1396 recoveries in the last 24 hours  
देश

Corona Update : कोरोना पुन्हा वाढतोय! देशात आढळले मागील ६ महिन्यातील सर्वाधिक रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

देशात गेल्या 24 तासांत 3,016 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, जी जवळपास सहा महिन्यांतील सर्वाधिक आहे. यासोबतच कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 13,509 वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, रोजाचा पॉझिटीव्हीटी रेट हा दर 2.73% वर वाढला आहे.

भारतात गेल्या 24 तासांत झालेल्यी 3,016 नवीन कोविड रुग्णांची वाढ कालपासून 40 टक्क्यांनी जास्त आहे. तसेच कोरोनाचा रोजचा पॉझिटीव्हीटी रेट 2.7 टक्के आणि आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट 1.71 टक्के नोंदविला गेला आहे.

14 मृत्यूंसह देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5,30,862 वर पोहोचली आहे. 24 तासांच्या कालावधीत महाराष्ट्रात तीन, दिल्लीतील दोन आणि हिमाचल प्रदेशात एक आणि केरळमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.03 टक्के रुग्ण आहेत, तर राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट 98.78 टक्के नोंदवला गेला आहे.

या आठवड्यात कोविड प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ आढळून आल्यानंतर अनेक राज्यांनी आपत्कालीन बैठका घेतल्या जात आहेत. दिल्ली, जिथे 16 जानेवारी रोजी संसर्गाची संख्या 0 वर आली होती, तेथे गेल्या 24 तासात 300 प्रकरणे नोंदली गेली.

मुंबई, पुणे, ठाणे आणि सांगली यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT