देश

कोरोनाबाबत दिलासादायक बातमी; कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत असलेतरी...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच यातील मृतांचा आकडाही जास्त आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाच लाखपेक्षाही जास्त झाली आहे. तर यातील दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. सध्या देशात रिकव्हरी रेट 58 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. 

भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. रुग्णांची संख्याही वाढतच जात आहे. पण दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत 3 लाखपेक्षाही जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर 3 टक्के आहे. हा दर अत्यंत कमी आहे, असेही हर्षवर्धन यांनी सांगितले.

याशिवाय रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण 19 दिवसांवर पोहोचली आहे. मात्र, लॉकडाऊनपूर्वी हे प्रमाण 3 दिवसांवर होते, असेही हर्षवर्धन म्हणाले. 

भारतात रुग्णांची संख्या 5 लाखांवर...

भारतात सध्या 5,10,672 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यापैकी 2,96,376 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 1,98,584 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत देशभरात 15,712 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढतेय

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढत आहे. ही बाब भारतासाठी चांगलीच आहे. मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे 10,245 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत 3 लाखांच्या आसपास रुग्ण देशभरात बरे झाले आहेत, अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या गटाची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT