Corona, Delhi, Maharashtra 
देश

Corona Update : देशातील रिकव्हरी रेट दिलासादायक, जाणून घ्या काय आहे परिस्थिती

सकाळ ऑनलाइन टीम

Corona Update In India भारतासह जगभरातील 180 पेक्षा अधिक देशाला कोरोना विषाणूनं घेरलं आहे. (Coronavirus) कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घ्यावे लागले. आता सर्वांच्या नजरा कोरोनावरील लशीवर खिळल्या आहेत. दरम्यान सोमवारी आरोग्य मंत्रालयाने जाही केलेल्या नवे आकडेवारी ही दिलासादायक आहे. मागील 24 तासांत देशात  COVID-19 चे 32,981 नवे  रुग्ण आढळले आहेत. तर 391 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा  96.44 लाखच्या घरात पोहचला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांपैकी  91 लाखपेक्षा अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. भारतातील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा दिलासा देणारा असून रिकव्हरी रेट  94.37 टक्के इतका आहे. सध्याच्या घडीला देशात 4 लाख सक्रीय रुग्ण आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत थंडीच्या दिवसात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळतील अशी भिती व्यक्त करण्यात आली होती. पण राजधानीतूनही दिलासादायक बातमी आहे. दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत आहे. येथील रिकव्हरी रेट  94 टक्केंवर पोहचलाय. 

24 तासांत 400 पेक्षा कमी रुग्णांनी गमावला जीव

मागील 24 तासांत 391 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. या आकड्यासह देशात आतापर्यंतच्या मृतांचा आकडा हा 1,40,573 इतका झालाय. एकूण रुग्णांचा आकडा  96,77,203 इतका असून 91,39,901 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

देशातील अन्य बातम्यांसाठी येथ क्लिक करा


महाराष्ट्रातील परिस्थिती 

महाराष्ट्रात रविवारी 4,757 नवे रुग्ण आढळले.  या नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 18,52,266 इतका झालाय. राज्यात 47,734 इतका आहे. महाराष्ट्रातील रिकव्हरी रेटही समाधानकारक अशी आहे. 17,23,370 रुग्ण बरे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT