Coronavirus esakal
देश

Coronavirus : सावधान! कोरोनाचा पुन्हा धोका वाढतोय; 24 तासांत आढळले तब्बल 'इतके' नवे रुग्ण

देशात कोरोना विषाणूनं (Coronavirus) पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे 919 नवे रुग्ण आढळून आले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला.

देशात कोरोना विषाणूनं (Coronavirus) पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत देशात 7,830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळं सक्रिय रुग्णांची संख्या 40,215 वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) दिली आहे.

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं धास्ती वाढली आहे. याआधीच्या दिवशी कोरोनाचे 5,676 रुग्ण आढ‍ळून आले होते. तर, याआधी देशात कोरोनाचे 5,880 रुग्णांची नोंद झाली होती. देशात रविवारी संपलेल्या मागील आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत 79 टक्के वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात 36 हजार रुग्णांची नोंद झाली.

तर, महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे 919 नवे रुग्ण आढळून आले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला. यात मुंबईतील 242, नागपुरातील 105, पुणे 58, नवी मुंबईतील 57 रुग्णांचा समावेश असल्याचं आरोग्य विभागानं जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे. राज्यातील एकमेव कोविड-19 मृत्यूची नोंद अकोला शहरात झालीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar: आधी पावसानं झोडपलं, आता भूकंपानं हादरलं पालघर; कासा, धुंदलवाडी परिसरात 3.1 रिश्टर स्केलचे धक्के

IND vs ZIM 2nd T20 LIVE: फ्रीमध्ये सामना कुठे पाहणार? वेळ, TV चॅनेल आणि LIVE Streamingची संपूर्ण माहिती

Live Updates Marathi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याची खोटी पोस्ट करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

CJP Protest : आंदोलकांचा चेहरा स्कॅन करणाऱ्या AI चा दिल्ली पोलिसांकडून वापर; गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह, कसं कामं करत हे तंत्रज्ञान?

karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

SCROLL FOR NEXT