covid 19 covid 19
देश

दिलासादायक! उपचाराधीन रुग्ण संख्या घटतेय

नामदेव कुंभार

coronavirus in india, covid-19, latest updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हळू-हळू कमी होत असल्याचं चित्र आहे. मागील महिनाभरापासून नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळेच सातत्यानं उपचाराधीन रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. महिनाभरात दहा लाख उपचाराधीन रुग्ण कमी झाल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 95,461 उपचाराधीन रुग्ण कमी झाले आहेत. देशात सध्या 17 लाख 93 हजार 645 रुग्ण उपचाराधीन आहेत.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात एक लाख 32 हजार 788 नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत तर तीन हजार 207 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत दोन लाख 31 हजार 456 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात सध्या दोन कोटी 83 लाख 7 हजार 832 जणांना कोरोनाची लागण झाली. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दोन कोटी 61 लाख 79 हजार 85 इतकी आहे. देशातील आतापर्यंत तीन कोटी 35 लख 102 जणांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 जणांचं लसीकरण झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT