Coronavirus in India | Covid Patient Updates in India
Coronavirus in India | Covid Patient Updates in India esakal
देश

धोका कायम! भारतात गेल्या 24 तासांत 18,930 नवीन कोरोना रुग्ण, 35 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना संसर्गातील (Coronavirus) चढ-उतारांचा काळ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 18930 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 35 जणांचा मृत्यू झालाय. बुधवारच्या तुलनेत आज सुमारे अडीच हजार अधिक प्रकरणं समोर आली आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 119457 वर पोहोचलीय. तर, दैनंदिन सकारात्मकता दर आता 4.32 टक्केवर पोहोचलाय. (Covid Patient Updates in India)

महाराष्ट्रात (Coronavirus in Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचे तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. बुधवारी इथं 3142 लोकांना विषाणूची लागण झाली. मुंबईत 695 जणांना कोरोनाची लागण झालीय. आता राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 19981 वर पोहोचली आहे. तर, ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 358 नवीन रुग्ण आढळल्यानंतर येथील बाधितांची संख्या 7,30,427 वर पोहोचली आहे.

दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 600 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आणि महामारीमुळं आणखी एकाचा मृत्यू झाला, तर संसर्ग दर 3.27 टक्क्यांवर आलाय. दिल्लीत एकूण संसर्गाची संख्या 19,38,648 वर पोहोचली असून मृतांची संख्या 26,276 वर पोहोचलीय. मंगळवारी संसर्गाची 615 प्रकरणं नोंदवली गेली, तर तीन जणांचा मृत्यू झालाय. दिल्लीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,590 आहे. सोमवारी, राष्ट्रीय राजधानीत 420 प्रकरणं नोंदवली गेली, तर संसर्ग दर 5.25 टक्के होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT