Covid19 Team eSakal
देश

देशात 3 लाख 37 हजार नवे कोरोना रुग्ण; 488 रुग्णांचा मृत्यू

भारतातील रुग्णसंख्येत घट झाली आहे.

सुधीर काकडे

देशात सध्या कोरोना रुग्णांची (Covid19) आकडेवारी वाढत जात असून, कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता आज समोर आलेल्या आकडेवारीमधून देखील असंच चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशात 3,37,704 नवे रुग्ण (Covid19 New Cases) आढळून आले आहेत. तर 488 जणांचा मृत्यू झाला आहे. तरी सकारात्मक बाब अशी की, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमी रुग्ण आढळून आले आहेत. मात्र असं असलं तरी एकुण आलेखाचा विचार केल्यास रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

देशात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या 2,42,676 एवढी आहे. राज्यात सध्या 21,13,365 सक्रिय रुग्ण आहेत. तर आता देशात कोरोनाबाधित होण्याचा दर 17.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर देशात सध्या 10,050 ओमिक्रॉन रुग्ण झाले आहेत. त्यामुळे यामध्ये 3.69 टक्क्यांनी यामध्ये वाढ झाली आहे.

कोरोना संसर्गाचा परिणाम मुलांपेक्षा प्रौढांवर जास्त होतो. मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त नाही किंवा त्यांच्यात गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत असं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. 12 ते 18 वर्षे वयोगटातील 197 रुग्णांवर एक अभ्यास करण्यात आला. ज्यांना कोविड-19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT