कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक छायाचित्र प्रतिकात्मक छायाचित्र
देश

स्फोट! दिवसभरात आढळले 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण

नामदेव कुंभार

दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरदिवशी कोरोनाची रुग्णसंख्या उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात चार लाख एक हजार 993 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तीन हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, गुजरातसह देशातील प्रमुख राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत दोन लाख 99 हजार 988 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या एक कोटी 91 लाख 64 हजार 969 इतकी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची दररोजची संख्या पाहता पुढील तीन दिवसांत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटींच्या पुढे जाऊ शकते.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत दोन लाख 11 हजार 853 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एक कोटी 56 लाख 84 हजार 406 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 32 लाख 68 हजार 710 रुग्ण उपचाराधीन आहेत.

दीडशे जिल्ह्यात निर्बंध शक्य

देशात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातमध्ये लॉकडाउन सुरू असल्याने रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमध्ये मर्यादित सवलतींसह निर्बंध लागू करण्याचा विचार केला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पंधरा टक्क्यांहून अधिक आहे, अशा दीडशे जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT