देश

कोरोना फोफावतोय! ११४ दिवसानंतर देशात रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ

सकाळन्यूजनेटवर्क

देशात करोना महामारीनं गंभीर स्वरूप धारण केले असून ११४ दिवसानंतर रेकॉर्डब्रेक रुग्णांची वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशांमध्ये ४३ हजार ८४६ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्याशिवाय मागील २४ तासांत १९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीनं पुन्हा एकदा आपले पाय पसरण्यास सुरुवात केले आहेत. नागरिकांच्या बेजबाबदार वागणूकीमुळे कोरोना महामारी पोफावत आहे.

रविवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं देशातील कोरोना आकडेवारीची माहिती दिली. त्यानुसार, गेल्या २४ तासलांत २२ हजार ९५६ रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. रविवारी वाढलेल्या नवीन रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख ९ हजार ८७ इतकी झाली आहे. तर आथापर्यंत एक लाख ५९ हजार ७५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटी १५ लाख ९९ हजार १३० इतकी झाली आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीसारख्या राज्यात कोरोना महामीरानं आपलं आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. एकट्या महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. राज्यात सर्वाधिक कोरोना विस्फोट पुण्यात झाला आहे. 

राज्यातील कोरोनावाढीनं चिंता वाढवली -
सलग तिसऱ्या दिवशी २५ हजारांहून अधिक करोना बाधितांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. करोनाची दुसरी लाट गंभीर ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात गेले 3 दिवस २५ हजारहून अधिक बाधितांची नोंद झाली होती. शनिवारी त्यात आणखी वाढ होऊन नवीन बाधितांचा आकडा २७ हजार १२६वर पोहोचला. राज्यात गेल्या २४ तासांत ९२ रूग्णांचा मृत्यू झाला, तर १४ हजार ४०० रूग्ण बरे झाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT