Miss world 2023 
देश

Miss World 2023: यंदा भारतात होणार 'मिस वर्ल्ड' स्पर्धा; जाणून घ्या तारीख अन् डिटेल्स

७१व्या सौंदर्यवती स्पर्धेचा बहुमान २७ वर्षांनी भारताला मिळाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Miss World 2023: यंदाचा 71वा 'मिस वर्ल्ड' स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान भारताला मिळाला आहे. तब्बल २७ वर्षांनंतर ही स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. यापूर्वी सन १९९६ मध्ये भारतानं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही स्पर्धा पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. (India set to host Miss World 2023 after 27 years India got this chance)

मिस वर्ल्ड ऑर्गनायझर ज्युलिया मोर्ले यांनी आपल्या निवेदनात सांगितलं की, "मला सांगायला आनंद होत आहे की, भारत ७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या फायनलचं नवं घर असेल. मी भारताला ३० वर्षांपूर्वी भेट दिली होती, तेव्हा पहिल्या क्षणापासून माझ्यामध्ये भारताबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली. आम्ही भारताची विशेष आणि वैविध्यपूर्ण संस्कृती तसेच जगप्रसिद्ध आकर्षणं शेअर करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. (Latest Marathi News)

पुढे त्यांनी सांगितलं की, या स्पर्धेसाठी शॉर्टलिस्टेड झालेल्या सुंदरींना एक महिन्याच्या कालावधीत विविध टप्पे पार केल्यांनतर ग्रँड फायनलमध्ये प्रवेश मिळेल. यामध्ये १३० देशातील स्पर्धकांचा समावेश असेल हे सर्व स्पर्धक जगाला आपल्यातील युनिक टॅलेंट दाखवण्यासाठी भारतात दाखल होतील आणि प्रतिष्ठित मुकूट जिंकतील. (Marathi Tajya Batmya)

भारतात कुठे आणि कधी होणार स्पर्धा?

भारतातील गोवा राज्यात ही स्पर्धा पार पडणार आहे. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मिस वर्ल्डच्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांची पणजी इथं भेट झाली. यावेळी त्यांच्यात मिस वर्ल्डच्या स्पर्धेचं आयोजन गोव्यात करण्याबाबत चर्चा झाली. स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळं गोव्यामध्ये याच वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होईल असं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT