Kavro_Veer Helmet 
देश

शीख जवानांसाठी खास 'वीर' हेल्मेट विकसित; अशी आहेत सुरक्षा फिचर्स

अत्याधुनिक उपकरणांसह पगडीधारी जवानांना वापरण्यास सोईचं असं हे जगातील पहिलंच हेल्मेट आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतीय लष्करानं शीख जवानांसाठी (Sikh Jawan) खास पद्धतीचं 'वीर' नामक हेल्मेट (Veer Helmet) विकसित केलं आहे. या जवानांना या हेल्मेट मुळं क्षेपणास्त्र सारख्या मोठ्या हल्ल्यातूनही यामुळं संरक्षण मिळू शकतं असा दावा करण्यात आला आहे. कानपूरस्थित ग्लोबल डिफेन्स अँड होमलँड सिक्युरिटी कंपनी MKU Ltd. नं या हेल्मेटची निर्मिती केली आहे. या हेल्मेटची खास बाब म्हणजे शीख जवानांना आपल्या पगडीवर देखील हे हेल्मेट वापरताना अडचण येणार नाही. आजपर्यंत जगभरात शीख जवानांना कोणत्याही अडचणीशिवाय वापरता येईल असं हेल्मेट नव्हतं. (India Sikh soldiers to get Veer helmets with ballistic protection)

काय आहे 'वीर' हेल्मेटची खासियत

या हेल्मेटला 'वीर' अर्थात Kavro SCH 111T असं नाव देण्यात आलं असून विशिष्ट बाबींचा काळजी घेऊन स्मार्ट डिझाईनसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बॅलेस्टिक प्रोटेक्शनसह ते बनवण्यात आलं आहे. शीख जवानांना डोक्यावरील कापडी पटक्यासह हे हेल्मेट वापरता येणार आहे. वीर हेल्मेटद्वारे जवानांच्या डोक्याला लेव्हल तीन प्रकारचं संरक्षण मिळू शकणार आहे. यामध्ये रिड्युस्ड हेल्मेट ट्रॉमा टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यामुळं वेगवान हल्ल्यानंतर होणाऱ्या जखमांपासून कवटीला संरक्षण मिळतं, असं MKU Ltd नं आपल्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

MACS ने सज्ज वीर हेल्मेट

मल्टि अॅक्सेसरी कनेक्टर सिस्टिमनं (MACS) सज्ज असं हे वीर हेल्मेट आहे. यामध्ये लेटेस्ट सेन्सर्स, कॅमेरे, टॉर्च, कम्युनिकेशन इक्विपमेंट आणि नाईट व्हिजन डिव्हाईस बसवलेले आहेत. अशी सर्व खास आणि अॅडव्हान्स फिचर्स लक्षात घेता लवकरच भारतीय लष्कराकडून १.५९ लाख हेल्मेटची ऑर्डर MKU Ltd. कंपनीला देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

Coastal Road Accident: BMW फ्लायओव्हरवरून खाली कशी कोसळली? धक्कादायक घटनेचा CCTV व्हायरल

UPI Transaction Fee : ऑनलाइन व्यवहारांना लागणार ब्रेक? केंद्र सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड, UPI शुल्क बदलामुळं वाढली चिंता

SMRITI MANDHANA: सुजी बेट्सला मागे टाकलं अन् स्मृती मंधानाने रचला इतिहास! महिला T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली

Vastu Benefits of Shankh: घरात शंख ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे; वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या शंखाचा योग्य प्रकार अन् दिशा!

SCROLL FOR NEXT