

PM Modi Birthday Event: IIM Jammu Students Get Notices
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित् भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी दिवे लावण्यात आले तर काही ठिकाणी सेवा संकल्प अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहिम राबवली गेली. आता काँग्रेस नेते सय्यद नसील हुसैन यांनी धक्कादायक असा दावा केला आहे. आयआयएम जम्मू इथं पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यानं एका विद्यार्थ्याला नोटीस पाठवण्यात आलीय आणि त्याला उत्तर न दिल्यास ५०० रुपये दंड करण्याचा इशाराही दिला आहे.