India slams Pakistan, says footprint of every major act of terrorism passes through this country 
देश

दहशतवादी हल्ल्यांची सर्व पाळेमुळे पाकिस्तानमध्येच

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : जगातील प्रत्येक मोठ्या दहशतवादी हल्ल्याची पाळेमुळे पाकिस्तानात आहेत. या देशात दहशतवाद्यांना केवळ आश्रयच नाही; तर प्रशिक्षणही दिले जाते, अशी टीका भारताने आज केली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानने जम्मू-काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करताना नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा उल्लेख केल्यावर भारताने वरील प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"शांततामय वातावरणातच सहकार्याची भावना रुजू शकते. या अजेंड्याचा राजकीय कारणासाठी गैरवापर केला जाऊ नये. चोरच कुंपणावर राखण म्हणून बसला असताना, आपल्याला विशेष काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे,' असे भारताच्या प्रतिनिधी पौलमी त्रिपाठी यांनी महासभेत सांगितले.

ही होती स्मीता पाटील यांची शेवटची इच्छा

पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी त्यांच्या भाषणात केवळ भारतातील अंतर्गत घडामोडींवरच चर्चा केल्याबद्दलही भारताने आश्‍चर्य व्यक्त केले. काही जण राजकीय फायद्यासाठी आमच्या देशातील घडामोडींचा आधार घेत आहेत आणि शांततेच्या गोष्टी करत आहेत. वास्तविक, जगातील सर्व मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची पाळेमुळे त्यांच्याच देशात सापडतात. त्या देशातील युवकांना पुस्तकांऐवजी बंदुका दिल्या जातात, महिलांवर अत्याचार होतात, अशी टीकाही भारताने पाकिस्तानवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT