corona, coronavirus, Covid 19 deaths 
देश

कोरोनाग्रस्तांच्या या आकडेवारीत भारत तिसऱ्या स्थानावर; मात्र तरीही मोठा दिलासा!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वाधिक घायाळ झालेल्या राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश झालाय. कोरोना विषाणूचा देशात वेगाने प्रसार होत असून अमेरिका आणि ब्राजीलमप्रमाणे भारतातही नव्या रुग्ण आढळण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रविवारी भारतात जवळपास 12 हजार नवे रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर असल्याची चिंताजनक परिस्थिती समोर आली आहे. जगात अमेरिकेत दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा हा भयावहरित्य वाढत आहे. त्यानंतर या यादीत ब्राझीलचा नंबर लागतो.

भारतातही दिवसगणिक 10 हजारहून अधिक रुग्ण आढळत असून वेगाने प्रसार होणाऱ्या कोरोनाने भारताची चिंता आणखी वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या महिन्यात  देशात दिवसागणिक 10 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेत हा दर 22, हजार 322 तर ब्राझीलमध्ये 25, 800 इतका आहे.  अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. एप्रिल आणि मेमध्ये याठिकाणी जवळपास लाखोच्या घरात रुग्ण आढळले आहेत. न्यूयॉर्कमध्ये  30,874 आणि न्यूजर्सीमध्ये 12,696 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

दोन महिन्यांपासून याठिकाणची परिस्थितीत इतकी बिकट आहे की रुग्णालयात रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. परिणामी कोरोनाच्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याची वेळ महासत्ता असलेल्या अमेरिकेसारख्या राष्ट्रावर ओढावली आहे.  गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्ली या शहरात अमेरिकेतील शहराप्रमाणे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळताना दिसत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना यातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा समाधानकारकरित्या वाढणे ही दिलासादायक घटना आहे. इतर देशाच्या तुलनेत मुंबई आणि दिल्लीतील रुग्णांचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे.  मुंबईत 45.65 तर दिल्लीत 38.36 टक्के लोक कोरोनामुक्त झाले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT