Uria Sakal
देश

Urea Import: यावर्षी अमेरिकेतून सर्वांत जास्त युरिया केला जाणार आयात

तब्बल ४७ हजार टन युरिया अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स बंदरावरून लोड करण्यात येत आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : देशात मान्सूनचे आगमन झाले असून शेतकरी पेरण्या आणि लागवडीच्या लगबगीला लागले आहेत. दरम्यान पिकाच्या वाढीसाठी वापरण्यात येणाऱ्या युरियाला भारतात खरीप हंगामात खूप मागणी असते. त्या पार्श्वभूमीवर भारताकडून अमेरिकेतून युरिया आयात केला जात आहे. दरवर्षीच्या सरासरीपेक्षा यावर्षी भारत सर्वांत जास्त युरिया आयात करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

(Uria Import News)

दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी भारतासाठी युरिया आयात करत आहे. तब्बल ४७ हजार टन युरिया अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स बंदरावरून लोड करण्यात येत आहे. हा युरिया पश्चिम भारतातील न्यू मंगळूर बंदरावर आणला जाणार आहे. कोरियाची ही कंपनी युरिया वाहतुकीसाठी एका टनासाठी ७१६ अमेरिकन डॉलर रूपये आकारणार आहे. दरम्यान अमेरिकेकडून एका टनामागे मालवाहतूक, लोडिंग आणि कर असा मिळून ६३५ ते ६४० अमेरिकन डॉलर एवढी किंमत आकारली जाणार आहे.

अमेरिका अधूनमधून युरिया निर्यात करणारा देश आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये भारतातील निर्यात केवळ 1.47 टन, 2020-21 मध्ये 2.19 टन आणि 2021-22 मध्ये 43.71 टन होती. दरम्यान यावर्षी ४७ हजार टन युरिया आयात केला जाणार आहे. हे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या आयात निविदेच्या विरोधात असल्याचं सांगितलं जात आहे. युरियासाठी जागतिक निविदा ११ मे रोजी निघाल्या होत्या.

पुढील महिन्यांत अमेरिकेकडून आणखी जहाजे येण्याची शक्यता आहे. हे आमच्या आयात स्त्रोतांमध्ये विविधता आणण्यात आणि इतर पुरवठादारांना संदेश पाठवण्यास मदत करेल, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. दरम्यान भारताने २०२१-२२ या आर्थिक वर्षात १०.१६ मेट्रिक टन युरिया आयात केला होता. त्यासाठी भारताने ६.५२ बिलियन डॉलर एवढे रक्कम दिली होती. दरम्यान चीन. ओमान, कतार, इजिप्त, युक्रेन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून भारतात युरिया आयात केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Temperature Drop: नागपुरात थंडीची लाट! तापमान १०.८ अंशांवर; नागरिकांना हुडहुडी

Sakal Suhana Swasthyam : अमृताकडे जाण्याचा मार्ग ज्ञानेश्वरीतून प्रशस्त; आध्यात्मिक योगगुरू श्री एम यांचे प्रतिपादन

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT