sputnik v covid-19 vaccine 
देश

ठरलं! रशियाची बहुचर्चित स्पुटनिक लस 'या' दिवशी होणार भारतात दाखल

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडची (RDIF) घोषणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरोधात अधिक प्रभावशाली ठरलेली रशियाची बहुचर्चित स्पुटनिक-व्ही लस भारतात लवकरच दाखल होणार आहे. १ मे रोजी या लसीची पहिली खेप भारतात दाखल होईल, अशी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दमित्रिव यांनी दिली. मात्र, अद्याप या पहिल्या खेपेत किती लसींचे डोस असतील हे स्पष्ट झालेलं नाही. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान, १ मे पासूनच भारतात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे.

दमित्रीव म्हणाले, "स्पुटनिक व्ही ची पहिली खेप भारताला १ मे रोजी पाठवण्यात येईल. यामुळे भारताला कोरोना महामारीवर मात करण्यात मदत मिळेल." RDIF सध्या जगभरात स्पुटनिक व्ही लसीची मार्केटिंग करत आहे. दरम्यान, RDIFने पाच बड्या भारतीय लस उत्पादक कंपन्यांसोबत वार्षिक ८५ कोटींहून अधिक लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. त्याचबरोबर भारतात लवकरच या लसीचं उत्पादनही सुरु होऊ शकतं, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

याशिवाय रशियन फार्मा कंपनी फर्मासिंटेजने सोमवारी म्हटलं होतं की, "रशियन सरकारची मंजुरी मिळताच कंपनी मे महिन्याच्या शेवटापर्यंत भारताला रेमडेसिव्हीर अँटिव्हायरल औषधाचे एक मिलियन डोस पाठवण्यास तयार आहे. त्याचबरोबर मेस्किकोच्या सरकारने स्पुटनिक व्ही बाबत एक महत्वाची पुष्टी केली आहे, ती म्हणजे त्यांच्या देशात वापल्या गेलेल्या सर्व लसींमध्ये स्पुटनिक व्ही ही सर्वात सुरक्षित लस आहे.

दरम्यान, भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. मोठ्या प्रामाणावर रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याने बेड, ऑक्सिजन तसेच इतर वैद्यकीय उपकरणांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. यामध्ये ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देशांकडून मदत पाठवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT