Cowin App
Cowin App Sakal
देश

भारत 'कोविन'च्या यशाची गाथा 20हून अधिक देशांसोबत करणार शेअर

विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशभरात कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आणि तो अंमलात आणण्यास मदत करणारा डिजिटल प्लॅटफॉर्म को-विनच्या यशाची गाथा भारत इतर देशांसोबत शेअर करणार आहे. 20 पेक्षा अधिक असे देश ज्यांनी स्वत:च्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी हे पोर्टल स्वीकारण्यामध्ये रस दर्शविला आहे, ते यामध्ये सहभागी होणार आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने 30 जून रोजी डिजीटल माध्यमातून कोविन जागतिक संमेलन आयोजित केलं जाणार आहे. यामध्ये दुसऱ्या देशाचे प्रतिनिधीत्व करणारे आरोग्य आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ सहभागी होतील.

20 हून अधिक देशांनी दाखवला कोविन पोर्टलमध्ये रस

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिएतनाम, पेरू, मेक्सिको, इराक, डोमिनिकन रिपब्लिक, पनामा, युक्रेन, नायजेरिया, संयुक्त अरब अमिरात आणि युगांडासारख्या अनेक देशांनी आपल्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेसाठी कोविन टेक्निकबाबत शिकण्यामध्ये रस व्यक्त केला आहे.

कोविनचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आरएस शर्मा यांनी म्हटलंय की, अनेक देशांनी कोविन प्लॅटफॉर्ममध्ये रस दाखवला आहे. याचा उपगोय जगातील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरण अभियानाचे संचलन करण्यासाठी केलं जात आहे.

त्यांनी म्हटलं की, या जागतिक संमेलनामध्ये बारत या डीजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सार्वभौमिक लसीकरणासंदर्भात आपले अनुभव व्यक्त करेल. भारताने कोरोना लसीकरणाचे धोरण, अंमलबजावणी, देखरेख आणि मूल्यांकनासाठी केंद्रीय आयटी प्रणालीच्या स्वरुपात कोविन विकसित केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Loksabha election : ''बारामतीमधील स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही 45 मिनिटं का बंद होते?'' निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

Lok Sabha Poll : खुलताबाद शहरातील काही केंद्रातील EVM बंद; मतदार वैतागले,महिलांचा त्रागा

Savaniee Ravindrra: 'मत न देताच परत यावे लागले' सावनी रवींद्रचा संताप, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना भेटूनही...

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: पुण्यात ठिकठिकाणी बोगस मतदान, नागरिकांना यादीत मिळेना नाव; मुंढव्यात ईव्हीएम बंद

IPL 2024 Playoff Scenarios : RCB अन् CSK या दोघांनाही मिळू शकते प्लेऑफची तिकिटे? डोके शांत ठेवून समजून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT