unlock 3 guidlines
unlock 3 guidlines 
देश

देशात 5 ऑगस्टपासून अनलॉक- 3 ; केंद्राने प्रसिद्ध केली नियमावली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम अनलॉकमध्ये टप्प्या टप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 3 साठी नियमावली जारी केल्या आहेत. 1 ऑगस्टपासून रात्रभर असलेला कर्फ्यू बंद होणार आहे. तसंच 5 ऑगस्टपासून जिम सुरू कऱण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, शाळा-कॉलेज 31 ऑगस्पर्यंत बंदच राहतील. मेट्रो, थिएटर, स्विमिंग पूल बाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जाणार नाही. सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. गर्दी करण्यास सक्त मनाई असेल. 

स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सुरक्षेची काळजी घेऊनच परवानगी दिली आहे. कन्टेंन्मेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन लागू राहील. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियमावलीनुसार कंटेन्मेंट झोनचा निर्णय जिल्हा प्रशासन घेईल. 

अनलॉक 3 मध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या, गंभीर रुग्ण, गर्भवती महिला आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी घरीच रहावे असं सांगण्यात आलं आहे. या लोकांना अत्यावश्यक किंवा आरोग्याशी संबंधित अडचण असेल तरच घरातून बाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे. 

सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक आहे. गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाला परवानगी नाही. तसंच वैवाहिक कार्यक्रमांमध्ये 50 पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही. तसंच अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त लोक असू नयेत असंही यामध्ये सांगण्यात आलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT